==============================
*चंद्रपूर* ============================= चंद्रपूर :- आगामी होऊ घेतलेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात कॉंग्रेस पार्टि कडून सक्षम उमेदवार म्हणून कुणाल राऊत यांची वर्णी लागणार अशी माहीती सुञानी दिली असून राखीव जागेचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर विदर्भासोबत संपूर्ण महाराष्ट्रात भाजपा पक्षाची हार पाहता आता चंद्रपूर विधानसभेत कॉंग्रेस पक्षाकडून कुणाल राऊत यांच्या सारख्या खंबीर नेतृत्वा असणारे निवडणूक रींगणात असल्याची चर्चा चंद्रपूर जिल्हात होतांना दिसत असून यंदाच्या 2024 वर्षातील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून अनेक नवीन दावेदार आपली दावेदारीसाठी पक्षा प्रमुखांकडे वाऱ्या करत आहे.
या दरम्यान कुणाल नितीन राऊत हे या सर्वाना मागे पाडून कॉग्रेसची दावेदारी निश्चित करणार हे नक्की. युवा नेता म्हणून 2007 साली कॉंग्रेस NSUI मध्ये प्रवेश करत त्यांनी युवा वर्गासाठी अनेक कार्य केले त्यानंतर नागपूर जिल्हा अध्यक्ष पासून तर युथ कॉंग्रेस जनरल सेक्रेटरी ते महाराष्ट्र युथ कॉग्रेस अध्यक्ष प्रयत्न जात सामाजिक कार्य करत समाजसेवा केली. राहुल गांधी व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वात त्यांनी भाजपा सरकार विरोधात अनेक आंदोलनही केली.
सरकारचा भ्रष्टाचार विरोधात त्यांनी लढा पण केला. आपले वर्चस्व पक्षातील वरिष्ठांकडे बनवून प्रदेश युथ कॉग्रेस अध्यक्ष असल्यामुळे ते राहुल गांधी यांचा अधिक निकट वरतीय म्हणून एक वेगळी ओळख आहे. तर अश्या खंबीर युवा नेतृत्वाला चंद्रपूर राखीव विधानसभा निवडणुकीत वर्णी लगणार अश्या चर्चैला उधाण आलेले आहे. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,