================================
भारत देश कृषी प्रधान देश असून खाण्यायोग्य गहू व तांदूळ राशन दुकानात नेहमी उपलब्ध होत नाही . या देशातील बहुसंख्य जनता गरीब वर्गात मोडते त्यांना चांगले धान्य वितरित व्हावे यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (PMGKAY)अंतर्गत मोफत राशन दिले जाते. या योजनेअंतर्गत भूमिहीन, मजदूर, अल्पभूधारक, ग्रामीण कुटुंब, अत्यंत गरीब अशा लोकांना समाविष्ट केले जाते. या गरीब जनतेला चांगल्या प्रतीचे गहू व तांदूळ न मिळाल्याने अनेक राशन कार्डधारक स्वतः धान्याची विक्री बाजारात करतात. सध्या स्थिती बघता अतिशय निकृष्ठ प्रतीचे गहू व तांदूळ खाद्य विभागा मार्फत पुरविले जाते अशी तक्रार खेमराज भाऊ नेवारे यांच्या कडे करण्यात आली तेव्हा लगेच दखल घेत पत्रव्यवहार करून शासनाद्वारे उच्च प्रतीचा खाण्यायोग्य गहू व तांदूळ पुरवठा करण्यात यावे असे खेमराज भाऊ नेवारे यांनी चर्चा करून निवेदन तहसीलदारांना दिले.
याप्रसंगी खेमराजभाऊ नेवारे, राशनकार्ड धारक तक्रारदार,नरेश वासनिक, तुषार रहाटे,अर्चना खवसे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,