*राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले विविध मागण्याचे निवेदन!*

0
19

===================================

*राष्ट्रवादी काँग्रेसने  जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले विविध मागण्याचे निवेदन!*

*जिल्हा सामान्य रुग्णालयात सर्वत्र पसरलेल्या घाणीचे व दुर्गंधीचे निराकरण करावे!*

*काटेकोरपणे रुग्णालयातील स्वच्छतेकडे लक्ष पुरविण्याबाबत दिले निवेदन.*

*चंद्रपूर*

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चंद्रपूर शहर उपाध्यक्ष राहुल देवतळे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पसरलेल्या दुर्गंधी बाबत तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात काटेकोरपणे स्वच्छता ठेवण्याबाबतचे व इतर मागण्या संबंधीचे निवेदन चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक महादेव चिंचोळे यांना दिले आहे.

चंद्रपूर हे अतिशय वर्दळीचे ठिकाण असून सदर रुग्णाल्यात जिल्ह्यातीलच नव्हे तर आजु-बाजुच्या जिल्ह्यातुन व राज्यातुन सुध्दा रुग्ण येवून उपचार घेत असतात.परंतु, जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर मध्ये येणाऱ्या रुग्णांना व नातेवाईकांना हिन दर्जाची वागणुक मिळत असून तिथे आवश्यक सुविधा अभावी जिकडे-तिकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दवाखाण्यात येताच घाण दुर्गंधी येत असते. याचाच अर्थ रुग्णालयातील प्रशासन स्वच्छतेबाबत गंभिर नसून त्याकडे जाणुन-बुजुन दुर्लक्ष केल्या जात आहे. असे आरोप ही निवेदनात करण्यात आले आहे.तसेच, रुग्णालयात असलेले शौचालय अपुरे असून त्यापैकी बहुतेक मोडक्या अवस्थेत आहेत. रुग्णालयात रुग्णांसोबत येणाऱ्या नातलगांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती नसल्याने जिकडे तिकडे घाण पसरली आहे. रुग्णालय हे जिल्ह्या ठिकाणी असल्याने अतिमहत्वाचे रुग्णालय आहे. रुग्णालयात असलेले सि.टी. स्कॅन व एम.आर.आय. मशिन बाबत रुग्णाला आवश्यकता पडल्यास एक महिना पर्यंत वेटींग दाखवीत असते. त्यामुळे कित्येक रुग्णांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, रुग्णालयातील डॉक्टरवर कोणाचेही वचक नसल्याचे दिसते. ओ.पी.डी. मध्ये रुग्णांची गर्दी असताना सुध्दा डॉक्टर तिथे वेळेवर उपस्थित राहात नसल्यामुळे रुग्णांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. तसेच, रुग्णालयातील औषधी साठ्याकडे सुध्दा लक्ष देणे आवश्यक व न्यायोचित असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. कारण की औषधाअभावी रुग्णांना त्रास सहन करावा लागत असून औषधे बाहेरुन खरेदी करावी लागत असल्याने या सर्व मुद्यांना घेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनेकदा निवेदने देण्यात आली असून निवेदनातील सर्व मागण्या कडे गांभीर्याने लक्ष देऊन सर्व समस्यांचे तात्काळ निराकरण करावे अशी मागणी केली आहे.             

देण्यात आलेल्या निवेदनाची योग्य ती दखल  घेण्यात न आल्यास   या विरोधात पक्षातर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूरची राहील.असे देखील सांगण्यात आले आहे, हे मात्र विशेष!    ==============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ===============================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here