*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरिक समिती चंद्रपूर व अखिल भारतीय अधिवक्ता परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष व्याख्यानाचे आयोजन*

0
15

================================

*पद्मश्री ऍडव्होकेट उज्वल निकम यांचे चंद्रपुरात व्याख्यान*
===============================

चंद्रपूर, दिनांक: 26 सप्टेंबर 2024

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरिक समिती चंद्रपूर व अखिल भारतीय अधिवक्ता परिषद चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने, नामवंत अधिवक्ता आणि ज्येष्ठ विधी तज्ज्ञ, ऍडव्होकेट उज्वल निकम यांचे ‘भारतीय नवीन कायदे’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

हे व्याख्यान दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10:00 वाजता प्रियदर्शनी सभागृह, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. अधिवक्ता उज्वल निकम हे त्यांच्या प्रभावी भाषणशैलीतून भारतीय नवीन कायदे आणि त्यांच्या अंमलबजावणी संदर्भातील मुद्दे स्पष्ट करतील.                                           

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरिक समिती चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे व अखिल भारतीय अधिवक्ता परिषद चंद्रपूर चे अध्यक्ष ऍड मुकुंद टंडन, जिल्हा महामंत्री ऍड आशिष धर्मपुरीवार यांच्यातर्फे सर्व चंद्रपूरकर नागरिक, अधिवक्ता, कायदा क्षेत्रातील विद्यार्थी, तसेच नवीन कायद्यांची माहिती जाणून घेण्यास इच्छुक असलेल्या सर्व नागरिकांना या व्याख्यानाला उपस्थित राहण्याचे विनम्र आवाहन तर्फे करण्यात येत आहे.

या व्याख्यानात भाग घेऊन भारतीय कायद्याविषयी सखोल माहिती मिळविण्याची सुवर्णसंधी सर्व नागरिकांना उपलब्ध होणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या ज्ञानसत्राचा लाभ घ्यावा, ही विनंती.

*डॉ. मंगेश गुलवाडे*
अध्यक्ष
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती समारोह नागरिक समिती चंद्रपूर

*अधिवक्ता मुकुंद टंडन*
अध्यक्ष
अखिल भारतीय अधिवक्ता परिषद चंद्रपूर =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   =================================          कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here