*आरमोरी विधानसभा क्षेत्राचे गोंड गोवारी समाजाचे इच्छुक युवा उमेदवार खेमराज भाऊ नेवारे यांना अटक.*

0
68

===============================            

*आरमोरी विधानसभा क्षेत्राचे गोंड गोवारी समाजाचे इच्छुक युवा उमेदवार खेमराज भाऊ नेवारे यांना अटक.*
नागपूर येथे विभागीय कार्यालयावर मोर्चा व जेलभरो आंदोलन आयोजित केले होते.या आंदोलनाला महाराष्ट्रातुन जवळपास एक लाखापेक्षा जास्त आदिवासी गोंड गोवारी जमात बांधव व भगिनी उपस्थित होते .गोंड गोवारी जमातीच्या संविधानिक मागण्या पूर्ण करण्यासाठी जेल भरो आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात प्रामुख्याने खेमराज भाऊ नेवारे हे सुद्धा मोर्चात सहभागी झाले. ते आमरण उपोषण कर्ते सचिन दादा चचाने,किशोर दादा चौधरी, चंदन दादा कोहरे यांची भेट घेण्यासाठी उपोषण स्थळी येणार आहेत अशी माहिती गुप्त सूत्रांद्वारे मिळताच ताबडतोब काही कळण्याच्या आत त्यांना नागपूर पोलिसांद्वारे अटक करण्यात आली.
त्यानंतर त्यांच्या सोबत पोलीस वाहनात देसाईगंज कुरखेडा, कोरची, आरमोरी,धानोरा,अर्जुनी /मोर. गडचिरोली व अमरावती या भागातील गोंड गोवारी समाजबांधवांनासुद्धा अटक करण्यात आली.                                                             खेमराज भाऊ नेवारे एक निर्भीड व्यक्तीमत्व असून कुठलीही भीती न बाळगता आपला समाज असो किंवा प्रसंगी कोणत्याही समाजासाठी स्वतःला झोकून देणारा,त्यांचे अनेक प्रश्न शासनासमोर मांडणारा असा खरा समाजसेवक/नेता नक्कीच आरमोरी विधानसभा क्षेत्राकरीता लाभावा अशी जनतेला अपेक्षा आहे.    =============================                    *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*        =============================                    कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here