====================================
*स्वावलंबी बनवून शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा – आ. किशोर जोरगेवार* ==============================
*महिला व बालविकास विभागाच्या वतीने महिला मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला.* ==============================
शासन महिलांसाठी विविध योजना राबवित आहे. यापैकी लाडकी बहीण योजने माध्यमातून राज्यभरातील लाखो महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. शासनाच्या अनेक योजना कार्यान्वित असल्या तरी त्या सर्व महिलांपर्यंत पोहोचत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आजच्या मार्गदर्शन शिबिरातून स्वावलंबी बनवून, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या योजनांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
महिला व बालविकास विभाग यांच्या वतीने चांदा क्लब मैदान येथे विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला सांस्कृतिक कार्य मंत्री, वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपिन पालिवाल, परिवीसाधीन अधिकारी कश्मीरा संके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नूतन पारधी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश खवले, नगर प्रशासन अधिकारी गायकवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी दीपक बनाईक, यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेन आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, “महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकार नेहमी पुढाकार घेत आहे. विशेषतः महिलांसाठी विविध योजना सरकारच्या वतीने राबवल्या जात आहेत. महिलांना स्वयंरोजगारातून आर्थिक सक्षम होता यावे यासाठीही शासनाच्या योजना आहेत. मात्र, त्यांच्या योग्य अंमलबजावणीचा अभाव आहे, हे सत्य नाकारता येत नाही.” ते पुढे म्हणाले की, “या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे मुख्य काम स्थानिक प्रशासनाचे आहे. त्यांनी यंत्रणा आणखी सक्षम करून लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ करण्याचे सूक्ष्म नियोजन करावे.”
आपल्या कुटुंबाचे, आणि विशेषतः मुलींच्या भविष्यासाठी शासनाच्या योजना अत्यंत उपयुक्त आहेत. या योजनांद्वारे मुलींच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनांचा उद्देश केवळ आर्थिक मदतच नाही, तर महिलांना त्यांच्या अधिकारांसाठी जागरूक बनविणे आणि समाजात सन्मानाने जगण्याची संधी प्रदान करणे आहे, असे आ. जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,