*वरोरा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी तसेच सोयाबीन वाणाचे संशोधक सुरेश गरमाडे यांचा शासना तर्फे वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन्मान*

0
18

===============================

*वरोरा*    ===============================           

चंद्रपूर :- वरोरा तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी तसेच सोयाबीन वाणाचे संशोधक सुरेश गरमाडे यांना शासनाचा वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्यांना २९ सप्टेंबर रोजी नॅशनल स्पोर्ट क्लब ऑफ इंडिया, वरळी, मुंबई येथे कृषि क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सदरचा पुरस्कार देण्यात आला.

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाकडून दरवर्षी योग्य व्यक्तींची निवड केली जाते यात जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वायगाव (भोयर) येथील प्रयोगशील शेतकरी तसेच एस बि जी 197 या सोयाबीन वाणाचे संशोधक सुरेश गरमाडे यांची निवड करण्यात आली त्यांना वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या मान्यवरांच्या हस्ते गरमाडे यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले.

सुरेश गरमाडे यांना कृषीभूषण पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे कृषी क्षेत्रातील प्रयोगशील शेतकरी, तज्ञ व गणमान्य व्यक्तीकडून त्यांना असंख्य शुभेच्छा देण्यात येत आहेत.     ===============================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ================================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here