==============================
*जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते उद्घाटन.*
=============================
*चंद्रपूर* ============================
चंद्रपूर(का.प्र.): हजरत टिपू सुलतान विचार मंच च्या माध्यमातून एक शाम इन्सानियत के नाम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 5 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या हस्ते चंद्रपूर चे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन तसेच चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल ही या कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख प्रवक्ता डॉ.मोहम्मद सैय्यद फज़लुल्लाह चिश्ती M Tech, PHD (GoldMedalist) संस्थापक – संचालक अल – फलाह रिसर्च फाउंडेशन नई दिल्ली, हे सखोल असे अत्यंत मोलाचे महत्त्वाचे मार्गदर्शन करणार आहे.
या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून मौलाना गुलाम नबी शहर काज़ी, चंद्रपूर, संत श्री मनीष भाईजी महाराज श्री स्वामी नारायण मंदीर, चंद्रपूर, भंते अनिरुध्द थेरो महाबोधी बुध्द विहार दुर्गापूर,रिव.अँथोनी अमीर सेंट अँड्र्यू चर्च (सि.एन.आय.)ख्रिस्ट इंचार्ज, चंद्रपूर, ग्यानी मनजीत सिंघजी गुरुद्वारा गुरू सिंघ सभा चंद्रपूर, अहेमद शरीफ अध्यक्ष – नॅशनल इन्वायरॉन्मेंट ॲण्ड पीस फाउंडेशन, नागपूर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
हज़रत टिपू सुलतान विचार मंचच्या माध्यमातून हा कार्यक्रम ठेवण्याचा मुख्य उद्देश हा आहे की, भारत देशाची एकता आणि अखंडता ला समर्पित अल्लाहचे सर्वश्रेष्ठ शेवटचे पैगंबर हज़रत मुहम्मद (स.अ.) यांचे सोनेरी विचार सर्व जाती धर्माच्या बांधवापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती हजरत टिपू सुलतान विचार मंच या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच हा जशाप्रकारे आज देशात ज्या पद्धतीने हिंदु – मुस्लिम, हिंदु – बौध्द, मुस्लिम – ख्रिश्चन, मुस्लिम – बौध्द, वाद निर्माण करून दोन समाजातील अंतर वाढविण्याचे कामकरण्यात येत आहे तो अंतर कमी करण्यासाठी किंबहुना ते संपविण्यासाठी “एक शाम इंसानियत के नाम” हा कार्यक्रम आयोजित केला आहे.ज्या वेळेस पैगंबर हज़रत मुहम्मद (स.अ.) जयंती असते त्या त्या वेळेस काही लोक अपशब्द तसेच बदनामी कारक वक्तव्य करत असतात, त्यामुळे हया कार्यक्रमा अंतर्गत असा प्रयत्न आहे की, पैगंबर मुहम्मद(स.अ.) यानी दिलेली शिकवण व त्यांनी मानवजाती साठी केलेले कार्य आपण ज्या देशात राहतो त्या देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याचे दिलेले आदेश, स्त्रियांसाठी केलेले आमुलाग्र बदल, गरीबांसाठी आपुलकी, दानातुन गरीब कल्याणसाठी दिलेले शिकवण, आपल्या शेजारीशी कसे वागावे असे अनेक ज्वलंत जगउध्दरासाठी दिलेले विचार ऐकण्यासाठी तसेच हिंदु – मुस्लिम – सिख – बौध्द – ईसाई सह सर्व जाती धर्मांमध्ये प्रेमाचे संवाद साधण्यासाठी व आज पर्यंत आपल्या शहरात आणि जिल्हयात टिकून असलेला भाईचारा असाच कायम ठेवण्यासाठी येत्या ५ ऑक्टोंबर २०२४ शनिवार रोजी संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सभागृह येथे एक शाम इंसानियत के नाम अंतर्गत “पैगंबर हज़रत मुहम्मद(स.अ.) सब के लिये” हा कार्यक्रम आयोजित केलेला असुन, आपण आपल्या शहरातील आणि जिल्हयातील जातीय सलोखा बंधुभाव कायम स्वरूपी टिकविण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. असे आवाहन हज़रत टिपू सुलतान विचार मंचचे संस्थापक इंजी.अमजद शेख , अध्यक्ष इंजी. ज़ुबेर आज़ाद, मौलाना गुलाम अहमद रज़ा(नूरानी), कोर कमिटी चे सलाउद्दिन काज़ी, सय्यद रमज़ान अली, मतीन कुरेशी, अजहर शेख, हाजी फ़ैसल पाशा, अबरार अली, अरबाब सय्यद, अझहर खान, आबीद शेख़, सोहैल मुस्तफ़ाई सह अन्य मान्यवर सदस्यानी केले आहे. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,