=============================
*चंद्रपूर* ===========================
चंद्रपूर (दिनांक ०२ ऑक्टोंबर, २०२४)
देशभरात दरवर्षी २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी केली जाते. जुल्मी इंग्रजांची राज्यसत्ता हाकलून टाकण्यासाठी त्यांनी सत्य, अहिंसा आणि शांतता या मार्गाने बहिष्कार आंदोलने चळवळी राबविल्या व देशाला स्वांतत्र्य मिळवून दिले. भारतातील सामान्य लोकांसाठी त्यांचे हक्क आणि जीवनासाठी लढण्यात बापूंच्या योगदानाची आठवण करण्यासाठी हा दिवस देशभरात साजरा केला जातो.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती संपूर्ण देशात अतिशय उत्साहाने साजरी केली जात आहे, या पवित्रदिनी माजी खासदार मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांच्या मार्गदर्शनात व विदर्भ किसान मजदूर कॉंग्रेस तर्फे युवा नेते श्री राहुलबाबू पुगलिया यांनी चंद्रपूर येथील गांधी चौक येथे महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मालार्पण करूण अभिवादन केले व आदरांजली वाहिली तसेच विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मालार्पण तथा पुष्पार्पण करूण आंदरांजली वाहिली.
आदरांजली कार्यक्रमाप्रसंगी शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक श्री देवेंद्र बेले, जिल्हा महासचिव तथा माजी नगरसेवक श्री अशोक नागापूरे, माजी नगरसेवक विनोद पिपळशेंडे, श्रीनिवास पारनंदी, सुधाकरसिंह गौर, स्वप्नील तिवारी, रतन शिलावार, अजय महाडोळे, कामगार नेते गजानन दिवसे, अजय रेड्डी, बाबुलाल करूणाकर, भारत जंगम, पृथ्वी जंगम, सायरा बानो, सुनिल बावणे, अजय शाह, मनोज बावीस्कर, अफताब पठाण, सुनिल दुधे, अनंता हुड, सुरेश बावणे, मुर्लीधर चौधरी, उपस्थित होते. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,