*_सकल आदिवासी समाज संघटना द्वारा आयोजित ५०० वा.विरागंणा महाराणी राणी दुर्गावती जयंती महोत्सवाचा महामेळावा विठ्ठल रुक्मिणी सभागृह, देवळी ता.देवळी जि.वर्धा येथे आयोजित…._*

0
13

================================         

*_मा.खा.अशोकजी नेते यांचे  देवळी येथील आदिवासी महामेळाव्याला प्रतिपादन.._*

*_सकल आदिवासी समाज संघटना द्वारा आयोजित ५०० वा.विरागंणा महाराणी राणी दुर्गावती जयंती महोत्सवाचा महामेळावा विठ्ठल रुक्मिणी सभागृह, देवळी  ता.देवळी जि.वर्धा येथे आयोजित…._*

दिं.०५ आक्टोंबर २०२४

ता.देवळी:-आदिवासी समाजाला योग्य न्याय देण्यासाठी व आदिवासी समाजाला पुढे नेण्यासाठी, आदिवासी समुदयांचे  सक्षमीकरण व आदिवासी परंपरेचे संरक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. देशाचे लोकप्रिय लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केंद्र शासनाच्या अनेक विविध योजना आदिवासी समाज घटकापर्यंत पोहचविण्याचे काम केले आहे.१५ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसामुंडा जयंती आदिवासी जनजाती गौरव दिन सुद्धा साजरा करण्याचे काम मोदीजींच्याच सरकारनी केले असुन एवढेच नाहीतर देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च पदी आदिवासी समाजाच्या पहिल्या महीला राष्ट्रपती म्हणून विराजमान महामहिम द्रोपदी मुर्मू हे सुद्धा भाजपाच्या सरकारच्याच कार्यकाळात झाले आहे.असे प्रतिपादन माजी खासदार तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती महाराष्ट्र राज्य श्री. अशोकजी नेते हे  सकल आदिवासी समाज संघटना द्वारा आयोजित ५०० वा.विरागंणा महाराणी राणी दुर्गावती जयंती महोत्सवाच्या  आयोजित कार्यक्रमाला अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.                                                                    सकल आदिवासी समाज संघटना द्वारा आयोजित ५०० वा.विरागंणा महाराणी राणी दुर्गावती जयंती महोत्सवाचा महामेळावा विठ्ठल रुक्मिणी सभागृह, देवळी  ता.देवळी जि.वर्धा येथे आयोजित करण्यात आले होते.                        यावेळी या महामेळाव्याला मंचावर अनुसुचित जाती/जनजाती सांसदीय समितीचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय राज्यमंत्री मान.श्री. फग्गनसिंह कुलस्ते,वर्धा चे माजी खासदार रामदासजी  तडस,जेष्ठ आदिवासी नेते तथा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त जनार्दनजी पंधरे,भाजपा वर्धा जिल्हाध्यक्ष सुनिलजी गफाट, देवळी- पुलगांव भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख राजुभाऊ बकाने, माजी आमदार संजयजी पुराम,प्रदेश कार्य.सदस्य किरणजी उरकांदे,भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकरजी आत्राम, वर्धा जिल्हा संयोजक राहुलजी चोपडे,भाजपा चिटणीस अर्चना वानखेडे, नगराध्यक्षा देवळी, सुचिता मडावी, जि.प.सदस्या मयुरीताई मसराम,पं.स.सदस्या दुर्गाताई मडावी,मसराम सर,तसेच मोठया संख्येने आदिवासी बांधव व महिला भगिनीं उपस्थित होते.                                                                              या जयंती महोत्सव महामेळाव्याला मा.खा‌.तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे तसेच सहसंयोजक विधानसभा निवडणूक संचालन समिती महाराष्ट्र राज्य अशोकजी नेते यांनी पुढे बोलतांना म्हणाले गोंडवाना राज्याची राणी दुर्गावती यांचा जन्म ०५ आक्टोंबर १५२४ रोजी झाला. त्यांची ५०० वी जयंती या ठिकाणी साजरी होत असून याचा मला आनंद आहे. मि अशोकजी नेते एक आदिवासीचा सेवक व भाजपा अनु. जनजाती मोर्चा चा राष्ट्रीय महामंत्री म्हणून आपणांस सांगुन इच्छितो की,  मातृभूमीच्या स्वाभिमानासाठी मुघलांच्या बलाढ्य सेनेचा सामना करून संपूर्ण भारतात, मातृशक्तीचे प्रतीक असणाऱ्या राज्याच्या व धर्माच्या रक्षणाकरिता प्राणाची पर्वा न करता आपल्या कुशल नेतृत्वाने व धैर्याने गोंडवाना साम्राज्याचा रक्षणासाठी मुगलसेनेचा सामना करतांना बलीदान देणारी महान क्रांतीकारी विरागंणा महाराणी दुर्गावती जींना या आजच्या दिनी ५०० वा महाराणी दुर्गावती जयंती महोत्सवा निमित्य शत: शत: नमन करतोय व महाराणी दुर्गावती जयंती च्या समस्त जनतेला हार्दिक शुभेच्छा देतोय. वर्धा जिल्यातील तालुका देवळी  या ठिकाणी सकल आदिवासी समाज बांधवांनी अतिशय चांगला जयंती महोत्सव महामेळावा आयोजित केला या मेळाव्याला शुभेच्छा देतोय असे प्रतिपादन यावेळी मा.खा.नेते यांनी व्यक्त ‌केले.  ==================================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ==================================        कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here