==================================
*चंद्रपूर* – मराठा सेवा संघ प्रणित कर्मवीर भाऊराव पाटील मुलांचे वसतिगृह, तुकूम, चंद्रपूर च्या भोजन कक्षाचे उदघाटन आज दिनांक 06 ऑक्टोबर 2024 रोज रविवारी दुपारी 12 वाजता करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. इंजि. दिपक खामनकर, जिल्हाध्यक्ष, मराठा सेवा संघ, चंद्रपूर, उदघाटक मा. सूर्यकांतजी खनके, संस्थापक, मातोश्री विद्यालय, तुकूम, चंद्रपूर, प्रमुख पाहुणे मा. दिपकभाऊ जेऊरकर, प्रदेश उपाध्यक्ष, मराठा सेवा संघ, महाराष्ट्र, मा. अशोकभाऊ सोनटक्के,प्रसिद्ध उद्योजक, चंद्रपूर, मा. दिलीप होरे, वसतिगृह कक्ष प्रमुख, मा. अनंता आत्राम, वसतिगृह कक्ष, सदस्य, मा. उषाताई धांडे, मार्गदर्शक, जिजाऊ ब्रिगेड, चंद्रपूर आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठा सेवा संघाचा वसतिगृह सुरु करण्याचा उद्देश असा आहे की, गाव खेड्यातील मुलं शहरांत येऊन आपलं शिक्षण, नोकरी तसेंच कोणता ना कोणता उद्योग करून स्वतः ची प्रगती करावी. आणि याबरोबरच मराठा सेवा संघाचे विचार गाव खेड्यापर्यंत पोहचवावे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने हे वसतिगृह असून कर्मवीर भाऊराव पाटील यांनी दिलेल्या मुलमंत्रावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक, उद्योग, आरोग्यविषय मार्गदर्शन तसेंच कामं करून शिक्षण कसे घेता येईल यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे कामं हे मराठा सेवा संघ करीत राहील.
या वसतिगृहात आजच्या घडीला 25 विद्यार्थी राहत आहे. यापूर्वी वसतिगृहातील 15-20 मुलं नोकरीं व व्यवसायात लागले आणि वाचनालयात अभ्यास करणारी जवळपास 200 मुलं-मुली शासकीय नोकरीला लागून स्वतः ची प्रगती केली. आणि हे विद्यार्थी आता आपलं सामाजिक ऋण फेडण्याच्या उद्देशाने वसतिगृहाला मदत करतात. या वसतिगृहाकरिता स्वतः ची भोजन व्यवस्था अत्यंत कमी दरात उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कारण मुलांना अभ्यास करण्याकरिता त्यांचा वेळ आणि पैसा कसा वाचविता येईल हाच उद्देश ठेवून आज भोजन कक्षाचे उदघाट्न मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. अनेक दात्यांनी आपा-आपल्या पद्धतीने जसे की तांदूळ, गहू, डाळ, भाजीपाला अशाप्रकारे जे पाहिजे ते कडधान्ये देण्याचे आवाहन केलेले. तसेच प्रत्येक महिन्यात ज्यांचा कोणाचा वाढदिवस असेल त्यानिमित्ताने वसतिगृहात आपला वाढदिवस साजरा करून त्या दिवसी विद्यार्थ्यांच्या भोजणाची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना किराणा सामान घेण्यात जास्त खर्च होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा. दिपकभाऊ जेऊरकर यांनी केले. संचालन मा. विनोद थेरे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मा प्रशांत गोखरे यांनी मानले. कार्यक्रमाला मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व वसतिगृहाची विद्यार्थी उपस्थित होते. ======≠========================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,