===============================
*सामान्य जनतेच्या अडचणी घेऊन खेमराज भाऊ नेवारे नगर परिषदेत आक्रमक.* ================================ देसाईगंज नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या भगतसिंग वार्डात अनेक समस्या आहेत. यात प्रामुख्याने पाण्याची समस्या या भागात अधिक प्रमाणात दिसून आली. बौद्ध विहार, नैनपूर मुख्य रोड वरील दिलीप माडावार यांच्या घरासमोर तसेच हनुमान मंदिर, देशमुख टोली येथे बोरवेल आहेत परंतु दिलीप माडावर यांच्या घरासमोरील बोरवेल ची अवस्था खूप वाईट आहे.त्याठिकाणी झाडा झुडपांचे अतिक्रमण झाले आहे,नालीत कचरा व घाण साचली आहे. मग या परिसरातील लोकांनी बोरवेलचे पाणी भरायचे कसे? आणि वापरायचे कसे? येथे साप विंचू नेहमी आढळतात हे तर सर्रास लोकांच्या आरोग्याशी खेळणे झाले! या मूलभूत बाबी कडे नगर परिषद अजूनही लक्ष का देत नाही?
असा एक सवाल और….?
या चर्चेद्वारे खेमराज भाऊ नेवारे व देसाईगंजवासियांनी केला आहे.
जर नगर परिषदेने सदर बोरवेल वर सौर ऊर्जे वरील पाण्याची टाकी निर्माण केली तर नागरिकांना सोयीचे होईल तेव्हा संपूर्ण भगतसिंग वार्डातील बोरवेलवर सौर ऊर्जेवरील पाण्याची टाकी बसविण्यात यावी.अशा मागणी बाबतचे निवेदन मुख्याधिकारी, नगरपरिषद देसाईगंज यांना खेमराज भाऊ नेवारे यांनी दिले.
याप्रसंगी रवी लांजेवार, जमीर शेख, नरेश वासनिक, मोहनदास पराते, गणेश तलमले, सचिन देशमुख, कैलास पाटील, दिलीप माडावर, अश्विनी लांजेवार, दुर्गा पराते, शोभा वरखडे, कांता तलमले, छगन कुथे, आकाश देशमुख,किशोर खोब्रागडे, प्रकाश रहाटे, सोनू शेंडे, विशाल दुनेदार, संतोष देशमुख,गोविंदा अवसरे, राजु पराते, रवी उईके, राहुल देशमुख, तुषार रहाटे,वैभव परशुरामकर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,