विकसित भारतासाठी पक्ष संघटन मजबूत करा खासदार नागेश गोडाम यांचे प्रतिपादन

0
26

==================================

चंद्रपूर ब्युरो

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए चे सरकार आहे,या देश विकसित राष्ट्र म्हणून उदयास यावा यासाठी पंतप्रधान मोदी अहोरात्र झटत भारतीय जनता पार्टीचे एकच लक्ष सर्वांगीण विकास हेच आहे.यासाठी राज्यात डबल इंजिनचे सरकार हवे आहे.राज्यात भाजपप्रणीत महायुतीची सत्ता कायम ठेवायची असल्याने विधानसभा क्षेत्रातील संघटना मजबूत केली तरच राज्यात डबल इंजिनची सत्ता स्थपित होऊन पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतील विकसित राष्ट्र उदयास येईल.त्यासाठी बुथवर लक्ष केंद्रित करा असे आवाहन भाजपाचे खासदार नागेश गोडाम यांनी केले.
ते महानगर भाजपा तर्फे शक्ती केंद्र बुथ निहाय बंगाली कॅम्प व पडोळी मंडळ येथील,मेरा बूथ सबसे मजबूत अभियानाअंतर्गत आयोजित बैठकीत बोलत होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहुल पावडे,जेष्ठ नेते प्रमोद कडू,माजी तालुकाध्यक्ष नामदेव डाहूले, राजू गोलीवार, किरण बुटले, प्रवीण गिलबिले,मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर, प्रलय सरकार,पुरुषोत्तम सहारे, महेंद्र जुमडे, मनोज पाल, महेश जीटे,रुद्र शनारायण तिवारी, संजय पटले,यांची उपस्थिती होती.
गोडाम म्हणाले,प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक बुथची जबाबदारी निश्चित करायची आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रनिहाय बुथमागे एका शक्ती केंद्रप्रमुखाची आवश्यकता आहे. प्रत्येक शक्ती केंद्रप्रमुख हासुद्धा पक्षाच्या संघटन बांधणीत महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही स्थितीत चंद्रपूर विधानसभेवरही पक्षाचा उमेदवार विजयी झाला पाहिजे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होणार आहे. भाजप ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बुथसाठी आपले कार्यकर्ते सज्ज असणे आवश्यक आहे. पक्ष व संघटन आहे म्हणून आपले महत्त्व आहे. आपल्यामागे संघटना नसेल, तर आपल्याला काहीच किंमत उरत नाही. हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संघटनेचा पाया अधिकाधिक विस्तारण्यावर प्रत्येकाने भर देणे आवश्यक आहे.अशी सूचना गोडाम यांनी केली.            ================================              *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ==============================              कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here