==================================
*याप्रसंगी माता शारदा मातेचे दर्शन घेत पांढरी भटाड या मठ्ठातील व पांढरी भटाड, येडानूर,मुरमूरी,या गावातील समस्या जाणून घेतल्या..*
चामोर्शी तालुक्यातील पांढरी भटाड या गावाला लागूनच बंजारा समाजाचे आराध्य दैवत सेवालाल महाराज यांचे मठ्ठ आहे.या मठ्ठात मा.खा.तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी दिं. ११ ऑक्टोंबर रोजी पांढरी भटाड,येडानुर,मुरमुरी या गावातील काही अडीअडचणी व समस्या जाणुन घेत माता शारदा देवी चे दर्शन घेतले.
याप्रसंगी पांढरी भटाड या मठ्ठातील व गावातील पाण्याची व्यवस्था, समाज मंदिर, शौचालय,तसेच या गावात ५२ लोकांचे वन हक्क पट्ट्याचे प्रश्न प्रलंबित आहे. येडानुर येथे विद्यार्थ्यांसाठी,व गावाच्या नागरिकांसाठी बस सेवा नियमित व सुरळीत करावी.मुरमुरी या गावी अनेक महिलांना मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे रोख रक्कम खात्यात जमा न झाल्याचे महिलांनी सांगितले यावर बोलतांना माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी म्हटले यात अनेक छोटे मोठे कारणे आहेत.यामध्ये खात्याला आधार लिंक नसणे,खात्यातील रक्कमेचा व्यवहार न करणे,असे अनेक छोटे मोठे कारण आहेत तरी पण यात महिला भगिनींनी निराश न होता.माझ्या चामोर्शी येथील जनसंपर्क कार्यालयात संपर्क करावा.प्रत्येक महिलांना माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचा लाभ मिळेल यामध्यें माझ्या महिला भगिनीं कुणीही लाभापासून वंचित राहु नये असे सांगत पांढरी भटाड,येडानुर, मुरमुरी या गावातील समस्यांचा निराकरण नक्कीच असे मा.खा.नेते यांनी आश्वासित केले.
यावेळी प्रामुख्याने जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम भाजपाचे नेते किशोर भाऊ पवार,गंगाराम महाराज,रामदास चव्हाण, हरिचंद जाधव,बाबुराव राठोड,प्रेमसिंग पवार,तसेच गावातील नागरिक जनता बंधू भगिनीं उपस्थित होते. ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,