*जुनोना येथे माळी समाज भवन तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन*

0
2

===================================

*जुनोना येथे माळी समाज भवन तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन*

चंद्रपूर, दि. 17 : विविध विकासकामांच्या उदघाटन प्रसंगी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.  जुनोना येथे माळी समाज भवन तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा नेते रामपाल सिंग, माळी समाजाचे अध्यक्ष विशाल लेनगुरे, सरपंच विवेक शेंडे, गंगाबाई देवगडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.                                ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘जुनोना गावातील विकासकामांसाठी अनेक निवेदने प्राप्त झाली होती. त्या निवेदनांचा स्वीकार करून विकासकामे पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या आशीर्वादाने जिल्ह्याची वेगवान प्रगती करता आली. जात-पात, धर्म न पाहता इतरांनी हेवा करावा असा विकास बल्लारपूर मतदारसंघाचा करण्यात आला.’        छत्रपती शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेत महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर मानवधर्म पाळण्याचा प्रयत्न केला. त्याचदृष्टीने समाज घडविण्याचे कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात कोणत्याही स्वरूपाचा भेदभाव केला नाही. त्यांचे स्वराज्य हे केवळ एका जातीचे, घराण्याचे नव्हते, तर ते जनसामान्यांचे राज्य होते. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त राज्यभर विविध उपक्रम राबविण्याचे भाग्य मला लाभले, असेही ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.                                                        ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘फिरते जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचवून गरजूंना लाभ मिळवून देण्याचे काम करण्यात येणार आहे. गावाचा विकास थांबता कामा नये. गाव, प्रभाग, विभाग, तालुका आणि जिल्हा असेल हे वेगाने प्रगतीच्या मार्गावर जावे यासाठी सर्वांच्या आशीर्वादाची आवश्यकता असल्याची भावना ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.                                                                    गोरगरिब व शेतकऱ्यासांठी महत्वपुर्ण निर्णय,केंद्र व राज्य सरकार गोरगरिब व कष्टकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.  =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*       =================================          कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here