*वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवारसमित्या नियुक्त करणार : सुधीर मुनगंटीवार*

0
2

=================================  

*वचननामा अंमलबजावणीसाठी विषयवारसमित्या नियुक्त करणार :  सुधीर मुनगंटीवार*           ===============================
मुंबई,  दि. १७ ऑक्टोबर २०२४:   ==============================
भाजपा हा वचननामा अंमलात आणणारा पक्ष आहे, यावेळी भाजपा महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यावर वचननामा अंमलबजावणीकरता विषयवार समित्या नियुक्त केल्या जातील असे प्रतिपादन भाजपाचे वचननामा समितीचे अध्यक्ष ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र प्रदेश भाजपाने विधानसभा निवडणुकांकरता कफ परेड येथील जागतिक व्यापार केंद्रात सुरू केलेल्या माध्यम केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये आणि प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते.                                                                  ना. श्री सुधीर मुनगंटीवार यावेळी पुढे म्हणाले की नागरिकांनी भाजपा वचननाम्याकरता त्यांच्या सूचना लवकर पाठवाव्यात. विविध स्तरावरून सूचना मागविण्यासाठी प्रदेश भाजपाच्या वचननामा समितीने सुमारे दहा हजारपेक्षा जास्त पत्रे राज्यभर पाठवली आहेत. भाजपा आपला वचननामा अंमलात आणणारा पक्ष आहे त्यामुळे नागरिकांनी भाजपा वचननामा समितीकडे आपल्या सूचना विश्वासाने पाठवाव्यात, असे ते म्हणाले. भाजपाने वचननाम्यातील मुद्द्यांची अंमलबजावणी करण्याकरता विषयवार अंमलबजावणी समित्या निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी सांगितले. ================================= राज्यात विविध क्षेत्रात झालेला विकास व प्रगती जनता पाहात आहे. रस्त्यांचे जाळे विस्तारले आहे. ऊर्जा व उद्योग क्षेत्रात राज्य पुढे आहे, कृषी, दुग्धोत्पादन,  मत्स्यव्यवसाय क्षेत्रातही पुढे आहे. विविध कल्याणकारी योजनांतही राज्य पुढे आहे.  सांस्कृतिक क्षेत्रात राज्याने नवा ठसा उमटवला आहे, असेही ते म्हणाले.  ==================================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ==================================        कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे

संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here