===============================
बंटी भाऊ भांगडीया यांना समाजातून विविध संघटना कार्यकर्त्यांचा जाहीर पाठिंबा. ================================ *चिमूर*
==============================
गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये माननीय आमदार बंटी भाऊ उर्फ कीर्ती कुमार भांगडीया यांचा सामाजिक व विविध कार्यक्रमांमध्ये तसेच त्यांच्या कार्याचा विकास बघता सामाजिक शैक्षणिक इतरत्र विकास कार्यामध्ये असलेला सहभाग, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये झालेले अमुलाग्र बदल घडून आणण्याचा त्यांचा सातत्याने असलेला प्रयत्न, गोरगरिबांना वैद्यकीय सेवेचा दिलेला लाभ, या प्रकारचे निरंतर प्रयत्न माननीय बंटी भाऊ भांगडीया सातत्याने करीत असतात. त्यांच्या समाजकारणावर अधिक भर असल्यामुळे सोबतच समाजातील तळमळीच्या लोकांची जाणीव बघता या सर्व बदलांमुळे आज रोजी 200 कार्यकर्तासह त्यांच्या कार्याला नतमस्तक होऊन कोणताही पक्ष संस्था किंवा संघटना यांचा भेदभाव न करता आमदार बंटी भाऊ भांगडीया यांच्या प्रचाराला जाहीर पाठिंबा दर्शविला.
त्या कार्यक्रमात प्रामुख्याने सामाजिक कार्यकर्ते, पक्ष नेते, पक्ष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महेश निमसरकर, गिरधर वरागडे, साजन भिमटे, धनराज मगरे, सुशील इंगोले, सागर सुखदेवे, वामन बिडवाईक यांची उपस्थिती होती.
माननीय बंटी भाऊ बंगाली यांच्याकडून नीलम भाऊ राचल्लावार, मजहर पटेल, हरीश भाऊ पिसे यांची विशेष उपस्थितीत सर्वानुमते बंटी भाऊ यांना येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला. यावेळी सर्व कार्यकर्त्यांचे व आलेल्या मान्यवरांचे बंटी भाऊ भांगडीय यांनी आभार व्यक्त केले तुमच्या सहकार्याच्या भूमिकला माझ्या कार्य करण्याच्या प्रणालीला मी कधीही तडा जाऊ देणार नाही असे स्पष्ट मत व्यक्त केले. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*