सावित्रीबाई फुले प्राथमिक तथा माध्यमिक शाळेत चाचा नेहरू जयंती बालक दिन उत्साहात साजरा

0
13

=================================

सावित्रीबाई फुले प्राथमिक तथा माध्यमिक शाळेत चाचा नेहरू जयंती बालक दिन उत्साहात साजरा ====================                                        ब्युरो रिपोर्ट चंद्रपूर            =====================                                उद्या,दिनांक 14 नोव्हेंबर रोजी सावित्रीबाई फुले प्राथमिक तथा उच्च प्राथमिक शाळेत गडचिरोलीतील हृदय संस्था, अंतर्गत असेस टु जस्टिस फॉर चिल्ड्रेन प्रकल्प चंद्रपूरच्या वतीने बालक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका भारतीताई पाजनकर यांची अध्यक्षस्थानी उपस्थिती होती. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून श्री शशिकांत मोकाशे क्षेत्रीय अधिकारी, विधीतज्ञ एडव्होकेट गेडाम, हृदय संस्था प्रकल्प व्यवस्थापक नरेश मायकलवार, समुपदेशिका राणी मेश्राम, क्षेत्रीय अधिकारी सोनम लाडे विशेष उपस्ताती राज मेश्राम संपादक टाइम 24 न्यूस हॅलो चांदा न्यूज चे संपादक शशी ठक्कर तसेच समुच्च शाळा विद्यार्थी गण व शिक्षक वृंद प्रामुख्याने उपस्थित होते, या कार्यक्रमाच्या उपलक्षतेमध्ये दहा विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्वयंप्रेरणेने भाषण तयार करून मंचावर सादर केले.                                                                                याप्रसंगी मार्गदर्शन करताना एडव्होकेट अक्षय गेडाम सर यांनी पोस्को कायदा विषयी व त्याच्या काही कलमान विषयी बालकांना व शिक्षकांना माहिती दिली, याप्रसंगी मार्गदर्शन करताना मार्गदर्शक श्री. शशिकांत मोकाशे यांनी बालकांना लैंगिक अत्याचारापासून तसेच समाजात घडणाऱ्या विपरीत घटना,                                                                               यापासून स्वयं स्वसंरक्षण कसे करावे, गुड टच, बॅट टच, ट्रिकी टच, से – नो म्हणजे नाही म्हणणे शिका, वेळ पडल्यास आरडाओरडा कशा पद्धतीने करून पळ काढावा, आई वडील किंवा वरिष्ठांना, शिक्षकांना सूचना कशा कराव्या, असाह्य परिस्थितीमध्ये टोल फ्री नंबर वन झिरो नाईन एट 1098, वन वन टू 112 यांचा वापर कसा करावा याबाबत प्रात्यक्षिकासह हसत खेळत वातावरणात बालकांकडून वदवून घेतले. प्रकल्प व्यवस्थापक श्री. नरेश मायकलवारांनी प्रकल्प बद्दलची व कार्याबद्दलची पूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाच्या सरते शेवटी चॉकलेट वाटप व फ्रेंडशिप बँड बांधून कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्मिती करून बालकांना आनंदाचा क्षण उपभोगला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हृदय संस्थेचे अधिकारी, शाळेतील शिक्षक वृंद श्री. मारोती दुर्गे सर, मनीषा आत्राम सर, वैशाली अस्वले मॅडम, माया रागीट मॅडम, वनश्री गेडाम मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दुर्गे सर रागीट मॅडम यांच्या मदतीने कुमारी महिमा साहू हिने केले तर आभार प्रदर्शन शिक्षिका रागीट मॅडम यांनी केले. व आनंदात सर्व कार्यक्रम सुखरूपतेने पार पडला.             ===============================                *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*         =============================                कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे

*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here