===============================
*बाल स्नेही बाल कल्याण समिती चे उद्घाटन व बालक दिन साजरा* महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण समिती व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, शासकीय मुलांचे निरिक्षण गृह बाल गृह, बाल न्याय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14.11.2024 रोजी बालक दिन साजरा करण्यात आला. ============================== तसेच बाल कल्याण समिती चंद्रपूर मार्फत बाल स्नेही बाल कल्याण समिती चे उद्घाटन करण्यात आले.बाल कल्याण समिती चंद्रपूर येथे जिल्हाभरातून येणाऱ्या पिडीत मुली, अनाथ, सापडलेली बालके यांना बाल स्नेही वातावरण मिळावे या उद्देशाने बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड क्षमा बासरकर यांच्या संकलपनेतून व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने बाल स्नेही बाल कल्याण समिती चे उद्घाटन १४ नोव्हेंबर 2024 रोजी बालक दिनाचे औचित्य साधुन बाल स्नेही बाल कल्याण समिती चे उद्घाटन मा. सुमित जोशी सर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव चंद्रपूर, मा. सौ. सीमा लाडसे मॅडम बाल न्याय मंडळ अध्यक्ष चंद्रपूर,यांच्या हस्ते करण्यात आले.बालक दिनानिमित्त बालगृहातील मुलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा व त्यांना स्टेज डेरिंग यावे हाच उद्देश ठेवून बालकांची वेशभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,1 मि. गेम्स घेण्यात आले.व विजेत्यांना पारितोषिके देवून गौरविण्यात आले. =========================== यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री. दिपक बानाईत, बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड क्षमा विजय बासरकर, बाल कल्याण समिती सदस्य ॲड अमृता पुरुषोत्तम वाघ,सौ वनिता गजानन घुमे, डॉ ज्योसना मोहीतकर, बाल न्याय मंडळ सदस्य ॲड मनीषा नखाते, सदस्य सौ.भावना देशमुख,जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साकरकर, शासकीय मुलांचे निरिक्षण गृह बाल गृह अधीक्षक श्री.सवाई सर उपस्थीत होते.या कार्यक्रमात सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा महिला बाल विकास कार्यालय कर्मचारी,रेल्वे चाईल्ड लाईन बल्लार्षा, चंद्रपूर चाइल्ड लाईन, आम्ही आमचे आरोग्य(मिरॅकल)संस्थेचे सदस्य, शासकीय मुलांचे निरिक्षण गृह बाल गृह, शासकीय मुलींचे निरिक्षण गृह बाल गृह, स्वाधार गृह, शक्ती सदन, किलबिल शिशु गृह, रुदय संस्था येथील सर्व सदस्य उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे संचलन जिल्हा बाल संरक्षण कक्ष च्या संस्थात्मक अधिकारी सौ. प्रीती उंदीरवाडे यांनी तर आभार प्रदर्शन समाजसेविका प्रतिभा मडावी यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष चे परिविक्षा अधिकारी श्री. सचींद्र नाईक, समुपदेशिका प्रिया पिंपलशेंडे, डाटा एन्ट्री ऑपरेटर श्री अजय कवाडे यांनी अथक परिश्रम घेतले. =========================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ========================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे*बाल स्नेही बाल कल्याण समिती चे उद्घाटन व बालक दिन साजरा*
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*