==============================
*निर्भय सेवा फाउंडेशन च्या वतीने संविधान दिना निमित्त अभिवादन आणि सेवाभावचे प्रतीकात्मक कार्य*
आज संविधान दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे निर्भय सेवा फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सेवाभावाचे एक सुंदर उदाहरण सादर केले.
कार्यक्रमादरम्यान, भद्रावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एक बुजुर्ग व्यक्ती दुर्मिळ वेशभूषेत दिसून आला. त्यांची दाढी व कटिंग खूप वाढलेली व वाळलेली होती. ही अवस्था पाहून निर्भय सेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी तत्काळ सेवा कार्य सुरू केले. संबंधित व्यक्तीची दाढी व कटिंग करून त्याला स्वच्छ केले व नवीन कपडे देण्यात आले.
ही कृती गरिबांची सेवा म्हणजेच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने अभिवादन असल्याचे प्रतिक बनले. संविधानाने दिलेले समानतेचे व मानवतेचे मूल्य प्रत्यक्षात उतरवण्याचा हा एक सकारात्मक प्रयत्न होता.
निर्भय सेवा फाउंडेशनचा हा सेवाभाव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी सुसंगत असलेली कृती उपस्थित नागरिकांनी भरभरून कौतुक केले. यावेळी फाउंडेशनच्या सदस्यांनी समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करण्याची प्रेरणा बाबासाहेबांच्या विचारांतूनच घेत असल्याचे सांगितले. यावेळी निर्भय सेवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुरज शहा, सचिव दीपक तूरारे, सह सचिव सुमित हस्तक, सचिन नक्सिने, रोहन गज्जेवार, बंटी रायपुरे, सुशांत रायपुरे, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*