आता जिल्ह्यात हेल्मेट सक्ती होणार! आदेशाची अंमलबजावणी होणार!

0
17

==============================

आता जिल्ह्यात हेल्मेट सक्ती होणार! आदेशाची अंमलबजावणी होणार!

===============================
मुंबई(वि.प्र.):आता जिल्ह्यात हेल्मेट सक्ती होणार, आदेशाची अंमलबजावणी होणार! असे मत बुद्धिजीवी वर्गांकडून व्यक्त केले जात असून आतातर गाडी चालवणारा आणि पाठीमागे बसणाऱ्या दोघांवरही हेल्मेट सक्ती होणार असे देखील बोलले जात आहे.कारण की या संबंधी वरिष्ठ स्तरावरून आदेश काढण्यात आले असून Section 129 of MV Act 1988 अन्वये विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर
यांचेवर सुरक्षा दृष्टीकोनातून अंमलबजावणी करणेबाबत चे आदेश दिनांक २५/११/२०२४ रोजी (अरविंद साळवे)
पोलीस अधीक्षक (मुख्यालय)
अपर पोलीस महासंचालक (वाहतूक).
महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या कार्यालयातून काढण्यात आले असून या आदेशानुसार
उपरोक्त विषयास अनुसरून, महाराष्ट्र राज्यातील मागील ०५ वर्षातील रस्ते अपघातांचा आढावा घेतला असता असे दिसून येते की, विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर यांचे अपघात, मृत्यूमुखी तसेच जखमींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच, Section 128 आणि 129 of MV Act 1988 कायदयातील तरतुदीप्रमाणे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पिलीयन रायडर यांचे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पोलीस घटकांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने दिलेले उद्दिष्ट व सूचनांची माहिती संबधित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना देण्यात यावी. तसेच, Section 128 आणि 129 of MV Act 1988 कायद्याची प्रभावीपणे व कडक अंमलबजावणी करण्यात यावी.
तसेच, वाहतूक केसेस करीता वापरण्यात येणाऱ्या ई चालान मशिन मध्ये १) विना हेल्मेट दुचाकीस्वार २) विना हेल्मेट पिलीयन रायडर हया दोन्ही केसेसची कारवाई Section 129/194 (D) MVA या एकाच हेडखाली आल्याने विना हेल्मेट रायडर व विना हेल्मेट पिलीयन रायडर यांची वेगवेगळी माहिती मिळत नव्हती.

तरी, ई चालान मशिन मध्ये Section 129/194 (D) MVA
शिर्षकामध्ये बदल करण्यात येत असून यापुढील कारवाई ही 1) Riding Without Helmet by Driver 2) Riding Without helmet by Pillion अशा दोन वेगवेगळे हेडखाली कडक व प्रभावीपणे करण्यात यावी. जेणेकरून, दुचाकीस्वार चालक व पिलीयन रायडर यांचे अपघात, मृत्यूमुखी व जखमीची संख्या निश्चितच कमी होण्यास मदत होईल ही विनंती आहे.या संबंधीचे लिखित निर्देश पत्र काढण्यात आले असून हा आदेश
पोलीस आयुक्त
ठाणे शहर, पुणे शहर, नागपूर शहर, छ. संभाजी नगर, सोलापूर शहर, नवी मुंबई, अमरावती शहर, पिंपरी चिंचवड, मिरा भाईंदर वसई विरार सह पोलीस सह आयुक्त वाहतूक, मुंबई व पोलीस अधीक्षक अकोला, अमरावती (ग्रा), बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, छ. संभाजी नगर (ग्रा), जालना, बीड, धाराशिव, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, कोल्हापूर, पुणे (ग्रा), सांगली, सातारा, भंडारा, सोलापूर (ग्रा), चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, वर्धा, नागपूर (ग्रा), अहमदनगर, धुळे, जळगांव, नाशिक (ग्रा), नंदुरबार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग,ठाणे (ग्रा), पालघर यांना पाठविण्यात आले आहे. व या संबंधीचे आदेश पत्र
पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक (ठाणे, पुणे, रायगड, छ. संभाजी नगर, नागपूर परिक्षेत्र नागपूर यांना पाठविण्यात आले असून आता हेल्मेट सक्ती होणार असे मत व्यक्त केले जात आहे.    ==============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*    ======≠========================                कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here