================================
*चंद्रपुर शहर पुलिस द्वारे आरोपी कडून देशी कट्टा व चार राउंड जप्त करुण वाचविले दोन इसमांचे जीव* ================================
दि. ०१/१२/२०२४ रोजी संदीप बच्छीरे, पोलीस उपनिरीक्षक, पोस्टे चंद्रपुर शहर, सोबत डि.बी पथका सह, प्रोव्हीशन, जुगार रेड, प्राणघातक हत्यार तसेच इतर अवैध धंदयावर कार्यवाही करणेकामी रवाना होवुन पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर परिसरात पेट्रोलींग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, एक इसम कोनाला तरी जिवे मारण्याचे उद्देशाने आनंद नगर महाकाली कॉलरी परीसरात आपल्या जवळ देसी कट्टा (बंदुक) घेवुन फिरत आहे अशा गोपनीय माहितीवरून इसम नामे कनैया उर्फ मुन्ना ठाकुर रघुनाथसिंग राठोड, वय ५३ वर्षे, जात-ठाकुर, धंदा मजुरी, रा. ओम नगर रयतवारी डीआरसी हेल्थ क्लब चंद्रपुर.ह.मु.सरदार पटेल वार्ड बल्लारपुर जि. चंद्रपुर यास ताब्यात घेतले असता सदर आरोपी हा पोलीस रेकार्डवरील असल्याचे दिसुन आले वरूण विचारपुस केली असता तेव्हा त्याने सांगीतले की, मला काही दिवसा पुर्वी दोन इसमांनी माझे परीवारा समोर मारहान केली होती, त्या गोष्टीचा मला राम होता. त्याकरीता मी त्यांना जिवे मारण्याचे उद्देशाने आपल्या जवळ देशी कट्टा व ०४ राउन्ड घेवुन त्यांचा माघावर होतो. असे म्हणुन त्याने आपल्या कमरेला खोचुन ठेवलेला एक गावठी बनावटीचा देशी कटटा व चार जिवंत बुलेट राउंड काढुन दिला. आरोपी बाबत अधिक चौकशी करून माहीती प्राप्त केले असता सदरबा आरोपी जिल्हा कारागृह चंद्रपुर येथुन पॅरोलवर रजेवरुन 02 वर्षा पासून फरार असल्याने पोलीस स्टशेन रामनगर येथे कलम २२४ भादवि अन्वये गुन्हा नोंद आहे. एक लोखंडी गावठी बनावटीचा देशी कटटा, त्याचे मुठीला लाकडाचे
१) १०,०००/-रू
२) ८,०००/-रु
आवरण, डाव्या बाजुला स्प्रिंगचा स्कू अं.कि. १०,०००/- रू चार पितळी धातुची बुलेट (रांउड), बुलेटचे समोरील टोकावर तांब्याची व अॅल्युमिनियम धातुचे आवरण असलेले, बुलेटचे मागचे बाजुला 9MM 2291 KF असे इंग्रजीत लिहलेले, अं. कि. २०००/- रू प्रती प्रमाणे
असा एकुण कि.१८,०००/- रू. बस्तु घटनास्थळ / जप्ती पंचनामा कार्यवाही करून जप्त केले
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री मुमंक्का सुदर्शण सा. मा.अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु सा., उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव यांचे मार्गदर्षनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकुरके सा. यांचे नेतृत्वत खाली पोउपनी संदीप बच्छीरे, पोहवा सचीन बोरकर, संतोषकुमार कनकम, नापोका कपुरचंद खैरवार, पोका ईम्रान खान, राजेश चिताडे, रूपेश रणदिवे, दिलीप कुसराम, ईर्शाद खान, विक्रम मेश्राम, रूपेश पराते, शाबाज सैय्यद, सारीका गोरकार यांनी केली आहे.
=============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*