==============================
आज दिनांक 4/12/2024 ला मुल तालुक्यातील सिंताळा येथे ग्रामपंचायत ला भेट देऊन बाल न्याय (काळजी व संरक्षण)अधिनियम 2015 च्या कलम 106 नुसार 18 वर्षाखालील बालकांना होणाऱ्या शारीरिक व मानसिक अत्याचारापासून बालकांना संरक्षण मिळवण्यासाठी व सुरक्षित वातावरण निर्मिती करिता ग्राम बाल संरक्षण समिती या दृष्टीनं शासनाने 10 जून 2014 रोजी काढलेले परिपत्रक नुसार ग्राम बाल संरक्षण समिती बैठक आयोजित करण्यात आली. त्यामध्ये बैठकीला अध्यक्ष म्हणून लाभलेले बबन भेंडार, सदस्य सचिन दांडेकर ग्रामसेवक,सदस्य मनोहर भुरसे पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका मंदाताई वासेकर,आशा वर्कर सालू भुसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक , विद्यार्थी उपस्थित होते. त्यामध्ये जिल्हा महिला बाल विकास विभाग जिल्हा बाल संरक्षण कक्ष अंतर्गत जिल्हा चाईल्डहेल्प लाईन च्या प्रणाली इंदूरकर सुपरवायजर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष प्रतिभा मडावी सोशल वर्कर, सखी वन स्टॉप सेंटर, कल्याणी रायपुरे केंद्र प्रशासक, राणी खडसे केस वर्कर, रुदय संस्थेच्या राणी मेश्राम समुपदेशिका ,शशिकांत मोकाशे शेत्रिय अधिकारी तथा बाल हक्क संरक्षण आयोग जिल्हा कृती दल सदस्य बैठकीला उपस्थीत होते. बैठकी मध्ये गाव स्थरावर बालकांच्या समस्या सोडवण्यासाठी बाल ग्राम संरक्षण समिती किती महत्वाची भूमिका असते याविषयीं चर्चा करुन गाव बाल सौरक्षण समिती गठित करुन ठराव घेण्यात आला. तसेच बाल विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार कोणतेही बालक बालविवाहास बळी पडू नये याविषयी मार्गदर्शन करतांना कार्यक्रमात उपस्थित मार्गदर्शक श्री शशिकांत मोकाशे यांनी बालविवाह, बाल लैंगिक अत्याचार, बाल कामगार, बाल तस्करी, बाल भिक्षेकरी, काळजी व संरक्षणाची गरज असणारी सर्वच बालके या बाबत माहिती दिली व बालविकास विभाग च्या योजना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, चाईल्ड हेल्प लाईन 1098 ही 0 ते 18 वयोगटातील मुलांना मदत करण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन मोफत 24 तास चालनारी फोन सेवा आहे. (1098 टोल फ्री क्रमांक) याविषयी माहिती देण्यात आली. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर, रुदय संस्थेच्या प्रकल्पा विषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सेविका आशा वर्कर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विषयाची मांडणी प्रतिभा मडावी यांनी केले शेवटी ग्रामपंचायत सचिव यांनी आभार मानून या कार्यक्रमाला पूर्णविराम दिला. ============================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*