===============================
जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाकडून बाल संगोपन कार्यशाळेचे आयोजन ============================== *चंद्रपूर* ============================= जिल्हा महिला व बालविकास कार्यालय चंद्रपूर येथे बाल संगोपन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चंद्रपूर शहर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके मॅडम कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री दीपक बानाईत सर, प्रमुख पाहुणे म्हणून,श्रीमती वनिता घुमे बाल कल्याण समिती सदस्य चंद्रपूर श्रीमती भावना देशमुख मॅडम बाल न्याय मंडळ सदस्य जिल्हा परिविक्षा अधिकारी श्री झोडे सर प्रामुख्याने उपस्थित होते, या कार्यक्रमाचा उद्देश बालकाच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील कार्यरत असणाऱ्या संस्थांना काळजी व संरक्षणाच्या बाबतीतले प्रशिक्षण देणे बालविवाहासारख्या प्रथेवर प्रतिबंध लावणे त्यासाठी जिल्ह्यातील 12 काळजी व संरक्षणावर काम करणाऱ्या संस्थांचे सामाजिक कार्यकर्त्यांसह एक दिवशीय दोन सत्रात कार्यशाळेचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा महिला बाल विकास अधिकारी श्री दीपक बानाईत सर यांनी केले मुलांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने काम करत असताना त्यांच्या बाबतीतले होणारे बदल त्यांना काळजी व संरक्षण च्या दृष्टीने लागणारी मदत हे करत असताना पण काळजी व संरक्षणावर काम करीत आहोत त्यांचा पुरेपूर बालकांना कसा लाभ देता येईल प्रस्ताविकतून सांगितले या कार्यक्रमाची सुरुवात श्री अजय साखरकर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांचे द्वारे बालविवाह वर शपथ घेऊन करण्यात आली या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना प्रभावती एकूरके मॅडम पोलीस निरीक्षक शहर चंद्रपूर यांनी बालविवाहाच्या प्रथेवर सखोल मार्गदर्शन केले. श्री डी बी झोडे सर परीक्षा अधिकारी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय यांनी आपल्या कार्यप्रणाली बाबतची पूर्ण माहिती दिली सदर कार्यशाळेमध्ये उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांना गृह चौकशीचे दरम्यान सामाजिक तपासणी अहवाल व इतर कागदपत्र वास्तविक तत पाहून कसे भरायचे त्यामुळे पुरेपूर बालकांना लाभ मिळेल चुका होणार नाही यावर प्रशिक्षण देण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर श्रीडी बी महाकाळकर सर प्रतिभा मडावी सोनाली ताजने संपूर्ण जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाचे कर्मचारी वृंद चाईल्ड हेल्पलाइन जिल्हा बाल संरक्षण कक्ष हृदय संस्था यांनी केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया पिंपळशेंडे तर आभार प्रदर्शन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले यांनीकेले, ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*