===============================
धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ ==========================
आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल
राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा ==========================
शेतकरी बांधवांनी मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार
============================
चंद्रपूर, दि. १३ : खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
==========================
पोर्टलवरील नोंदणीसाठी दि. १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नोंदणी केंद्रावरील गर्दीमुळे नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. शेतकरी धान खरेदी नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी मुदतवाढ देण्याची शेतकरी तसेच अभिकर्ता संस्थानी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे मागणी केली होती. आमदार सुधीर मुनगंटीवार मागणीची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिवांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शेतकरी नोंदणीकरीता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली. तात्काळ दखल घेत काही तासातच शासनाचे अवर सचिवांनी नोंदणीकरीता दि. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
============================
राज्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे मागणीची तात्काळ दखल घेऊन शासनस्तरावर पाठपुरावा करत काही तासातच मुदतवाढ मिळाल्याबद्दल शेतकरी बांधवांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहे. ============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =========================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*