*लहान मुला मुलीं वर होणाऱ्या लैंगिक अत्याचार संदर्भात रुदय संस्थेचे वतीने सिंदेवाहित मार्गदर्शन कार्यशाला सम्पन्न*

0
3

==============================

*लहान मुला मुलीं वर होणाऱ्या लैंगिक अत्याचार संदर्भात रुदय संस्थेचे वतीने सिंदेवाहित मार्गदर्शन कार्यशाला सम्पन्न*           ==============================               दिनांक 18- 12 -2024 ला सिंदेवाही तालुक्यातील मुरमाडी गावामध्ये रुदय संस्थेच्या वतीने असेस टु जस्तीस प्रकल्प चंद्रपूर प्रकल्पाचे डायरेक्टर श्री काशिनाथ देवगडे सर शशिकांत मोकाशे, नरेश म्यकलवार यांच्या मार्गदर्शनात सिंदेवाही तालुक्यातील ICDS अंतर्गत येणाऱ्या तीनही सर्कल मधील अंगणवाडी सेविकांची कार्यशाळा घेण्यात आली.                             
या कार्यशाळेमध्ये डॉक्टर कल्याण गडरी सर मुंबई. तसेच पर्यवेक्षिका मॅडम सौ रंजना चौधरी व पर्यवेक्षिका रुक्सार शेख मॅडम रुदयसंस्थेच्या क्षत्रिय अधिकारी सोनम प्रामुख्याने उपस्थितउपस्थित होत्या. कार्यशाळे दरम्यान बालविवाह मुक्त भारत या अभियानाच्या संकल्पनेतून पोस्को कायदा, मुला,- मुलींवरील होणारे लैंगिक अत्याचार, गुड टच बॅट टच तसेच किशोररवयीन मुलींची सभा घेताना योग्य ते मार्गदर्शन करावे व लैंगिक अत्याचारापासून बचाव कसे करावे, व त्यांना चाइल्ड हेल्पलाइन नंबर1098 सांगण्यात आले. यावर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच त्यांना बाल संगोपन योजनेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेमध्ये अंगणवाडी सेविकांची एकूण उपस्थिती 130 होती तर मदतनीस व इतर कार्यकारी सुद्धा उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयसीडीएस कर्मचारी तर आभार प्रदर्शन क्षेत्रीय अधिकारी सोनम लाडे असेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्प यांनी केले.      =============================                  *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ==============================                कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here