============================== *चंद्रपूर* =============================
*ऑपरेशन मुस्कान” मुळे मिळाले पालकांचे ओठावर हसु…*
दिनांक १ डिसेंबर, २०२४ ते २० डिसेंबर, २०२४ दरम्यान चंद्रपूर जिल्हयातील वेगवेगळया पोलीस स्टेशन अंतर्गत बेपत्ता व पळविलेली मुले, मुली तसेच बेपत्ता महिला व पुरुषांच्या शोधासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात “ऑपरेशन मुस्कान” मोहिम राबविण्यात आली. “ऑपरेशन मुस्कान” या विशेष मोहिम करीता चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील अनैतिक मानवी वाहतुक व्यापार प्रतिबंध कक्ष, स्थानिक गुन्हे शाखा तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथक नेमण्यात आले.
“ऑपरेशन मुस्कान” या विशेष मोहिमे दरम्यान जिल्हयातील पळविलेल्या मुले, मुली पैकी १ मुलगा आणि ५ मुलीचा शोध घेवुन त्यांच्या आई-वडील, कायदेशीर पालकांचे स्वाधिन करण्यात आले आहे.
तसेच बेपत्ता झालेल्या महिला व पुरुष पैकी १३३ महिला आणि ७१ पुरुष असे दिनांक १ डिसेंबर, २०२४ ते २० डिसेंबर, २०२४ पावेतो जिल्हयात एकुण २१० मुले, मुली आणि महिला व पुरुषांचा शोध घेण्यास चंद्रपूर जिल्हा पोलीस दलास यश आले आहे.
विशेषतः या विशेष मोहिम दरम्यान सन २०१६ व २०१७ मधील हरविलेले दोन तरुणींचा शोध घेण्यास यश आले आहे.
सदरची मोहिम अपर पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी समवेत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा व सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी व त्यांचे अधिनस्त विशेष पथक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================ कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*