*मोहरम निमित्त जिल्हा कारागृह परिसरात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शरबत वाटप*

0
29

=============================    मोहरम निमित्त जिल्हा कारागृह परिसरात यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शरबत वाटप ==============================                   *चंद्रपूर*                                                                       ===========================            मोहरम निमित्त चंद्रपूर कारागृहातील हजरत मखदुम उर्फ गैबीशाह वली दर्ग्यावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शरबत वितरण करण्यात आले. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर अध्यक्ष राशेद हुसेनसलीम शेखताहिर हुसेनअबरार शेखरजिक खानअसलम शेखशहबाज खानप्रवीण कुलटेसायली येरणेअनिता झाडेमाधुरी निवलकरनंद पंधरेशांता धांडेअल्का मेश्राम आदींची उपस्थिती होती.       ===========================                हजरत हुसेन रजी हे इस्लाम धर्माचे प्रवर्तक हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू होते. मोहरमच्या दिवशी ते शहीद झाले होते. त्यामूळे या दिवसाची आठवण म्हणून मोहरमच्या नवमी आणि दहावीला चंद्रपूरातील कारागृहात असलेला हजरत मखदुम उर्फ गैबीशाह वली यांचा दर्गा सर्व सामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येतो. यंदाही या दिवशी कारागृहातील दरवाजे खुले करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या भाविकांची सेवा म्हणून येथे पोहोचलेल्या हजारो भाविकांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शरबत वाटप करण्यात आले.                      ==============================     मोहरमच्या पवित्र दिवशीदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना शरबत वाटप करून यंग चांदा ब्रिगेडने सामाजिक आणि धार्मिक सेवा दिली. यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी भाविकांची सेवा करताना मोठ्या उत्साहाने शरबत वाटप केले.                                                                              ===============================        *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ==============================      कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे                                  संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here