*शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली पी एम किसान पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करू : शेतकरी नेते सुर्या अडबाले*

0
24

===============================

*शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली पी एम किसान पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा अन्यथा तीव्र आंदोलन करू : शेतकरी नेते सुर्या अडबाले*          ==============================                 पी एम किसान योजनेअंतर्गत पिक विमा योजना शेतकरी हितासाठी काम करीत असल्याचा दावा सरकारकडून सातत्याने केला जातो पण प्रत्यक्षात मात्र स्थिती अतिशय गंभीर आहे चंद्रपूर जिल्ह्यात 2023 या सत्रात अतिवृष्टी झाली होती मात्र 55 हजार 775 शेतकरी अजूनही पंतप्रधान पिक विमा योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे आता तातडीने त्यांना लाभ द्यावा पिक विमा योजना अतिवृष्टी,दुष्काळ ,यासारख्या परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळावी यासाठी पंतप्रधान पिक विमा योजना सुरू करण्यात आली पण ही योजना पुर्तीत खोटी ठरते की काय अशी स्थिती दिसत आहे या योजनेच्या माध्यमातून पिक विमा कंपन्या मालामाल होत आहे दुसरीकडे बळीराजाला मदतीकरिता वाटच वाट बघावी लागत आहे पिक विमा योजनेअंतर्गत 2023 च्या खरीप हंगामात चंद्रपूर जिल्ह्यातील 3 लाख 50 हजार 976 योजनेअंतर्गत नुकसान भरपाई साठी अर्ज केले होते या हंगामात अवकाळी पाऊस पिकांवर झालेले रोगाचे आक्रमण यामुळे कापूस, धान ,व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले होते या दरम्यान अर्जापैकी 1 लाख 43 हजार 991 शेतकऱ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी पात्र ठरविण्यात आले होते त्यांना 191 कोटी 49 लाख 87 हजार रुपये योजनेचा लाभ मिळणे अपेक्षित होते मात्र आतापर्यंत यापैकी 88 हजार 216 लाभार्थींना शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे पैसे आले आहेत 80 कोटी 18 लाख 78 हजार एवढी ही रक्कम आहे उर्वरित 55 हजार 775 शेतकरी 111 कोटी 31 लाख 9 हजार रकमेच्या प्रतीक्षेत आहे योजनेत पात्र असूनही शेतकरी बांधवांना अजूनही मदतीची रक्कम मिळालेली नसल्याने ते कमालीचे संतापले आहे शेतीचा हंगाम सुरू झाला आहे अशावेळी नुकसान भरपाईची मदत तातडीने देण्याची गरज आहे, =============================            वेळेवर मदत न देणे पात्र अधिकाधिक शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्याचा प्रयत्न करणे यास अन्य मुद्द्यावरून पीक विमा कंपनीच्या धोरणा विरोधात अधिक शेतकऱ्यात संताप आहे अशा स्थितीत पात्र असून देखील चंद्रपूर जिल्ह्यातील 55 हजार 775 शेतकरी मदतीच्या अपेक्षित आहे, =============================                 मा. जिल्हाधिकारी साहेबांनी  ही गंभीर बाब लक्षात घेता  याकडे लक्ष देऊन तातडीने त्यांना मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय समोर स्वराज्य शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकरी नेते सुर्या भाऊ अडबाले यांनी दिला आहे,             ==============================           *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*                                               ===============================                 कार्यकारी संपादक शशिकांत मोकासे                              संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here