*बाल कल्याण समिती अध्यक्षा ॲडव्होकेट क्षमा बासरकर यांच्या उपस्थितीत असेस टू जस्टिस प्रकल्पाची 24-25 ची समन्वय कार्यशाळा संपन्न*

0
18

============================      

*चंद्रपूर*                                                                         ===========================          दिनांक 24जुलै 2024. रोजी बाल कल्याण समिती कार्यालय येथे असेस टु जस्टिस प्रकल्पाचे अंतर्गत बालकांची संबंधित कायद्यांवर बालकांची संबंध ठेवणाऱ्या संस्थांची आढावा व समन्वय कार्यशाळा जिल्हा व महिला बालविकास अधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात माननीय बालकल्याण समिती अध्यक्षा ॲडवोकेट क्षमा बासरकर यांच्या उपस्थितीत पार पडली. सदर बैठकीला प्रामुख्याने उपस्थिती माननीय बालकल्याण समिती, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, असेस टु जस्टिस प्रकल्पाचे संपूर्ण टीम जिल्हा सिटी चाईल्ड लाईन, रेल्वे चाईल्ड लाईन, यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडली. सदर कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रकल्प व्यवस्थापक नरेश मायकलवार यांनी तसेच विषयाची मांडणी सुद्धा यांच्याद्वारे करण्यात आली विविध विषयावर मागील वर्षी येणाऱ्या अडचणी 2024 25 चा आराखडा, बालकांची संबंधित काम करताना संयुक्तिक रित्या नियोजन, ज्यामुळे कमी कर्मचारी काम पूर्ण करता आले पाहिजे, बालकांच्या विविध योजना राबवताना समन्वय, गरजू व्यक्तींपर्यंत पारदर्शी योजना पोहोचवणे व त्यांचा लाभ त्याला मिळवून देणे, बालविवाह प्रकरणांमध्ये पोलीस विभाग व बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तसेच सहाय्यक म्हणून अंगणवाडी सेविका, आशाताई यांचा समन्वय कसा साधता येईल . त्यांच्या कार्यशाळेचे आयोजन करून कायद्याची माहिती पोहोचवणे इत्यादी विषयावर सखोल मार्गदर्शक चर्चा करण्यात आली. त्या प्रसंगी मागील 23 – 24 च्यासत्रात चंद्रपूर जिल्ह्यात असेस टु जस्टीस प्रकल्प अंतर्गत झालेल्या कार्याचे वाचन काशिनाथ देवगडे सर यांनी केले तसेच प्रकल्प व्यवस्थापक श्री नरेश मायकलवार व क्षत्रिय अधिकारी श्री शशिकांत मोकाशी यांनी मागील सत्रात आलेल्या समस्या बालविवाहात होणाऱ्या अडचणी व तेथे कमी पडत असलेला समन्वय याबद्दलचे काही उदाहरणं व काही झालेल्या केसेसचे निष्कर्ष मांडले. त्यावर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्री अजय साखरकर हृदय संस्थेचे संचालक श्री काशिनाथ जी देवगडे, माननीय बालकल्याण समितीच्या अध्यक्ष ॲडव्होकेट क्षमा बासरकर, समिती सदस्य ॲडव्होकेट अमृता वाघ, जोशना मोहितकर मॅडम यांनी आलेल्या प्रश्नाचे संपूर्ण समाधान केले व पुढील सत्रात याचे नियोजन कटिबद्ध राहील असेही सांगितले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर म्हणून रेल्वे चाईल्ड लाईन बल्लारपूर सुपरवायझर श्री भास्कर ठाकूर, हृदय संस्थेच्या वतीने असेच तू जस्टीस प्रकल्पाचे ॲडव्होकेट अक्षय गेडाम, समन्वयक समन्वयक राणी मेश्राम, क्षेत्रीय अधिकारी भद्रावती अंबागडे क्षत्रिय अधिकारी मुल सोनम लाडे, जिल्हा चाईल्ड लाईन तर्फे श्री अंकुश उराडे, हृदय संस्थेचे लेखापाल सोमेश्वर निशाने,गडचिरोली जिल्हा समन्वयक कविंद्र नागपुरे, महिला व बालकल्याण समितीचे कर्मचारी अजय कवाडे, व इतर आमंत्रित मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते प्रकल्पाचे क्षेत्रीय अधिकारी श्री शशिकांत मोकाशी यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले व अध्यक्षांच्या संमतीने सदरच्या कार्यशाळेला पूर्णविराम देण्यात आला.                                                ===============================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here