==================================
ना.मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून 5 कोटी 39 लक्ष रुपयांचा बॅडमिंटन हॉल ; सिंथेटिक मॅटसह सर्व सुविधा
चंद्रपूर, दि. 3 : चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा आणखी एक संकल्प सिद्धीस गेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यासाठी अद्ययावत बॅडमिंटन हॉलचा संकल्प त्यांनी केला होता. त्यानंतर त्यासाठी 5 कोटी 39 लक्ष रुपयांचा निधी त्यांच्या विशेष प्रयत्नांतून प्राप्त झाला. बॅडमिंटन हॉलचे अद्ययावतीकरण आता पूर्ण झाले असून सर्वसुविधायुक्त हॉलचे उद्घाटन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ९ सप्टेंबर २०२४ ला होणार आहे.
क्रीडा संकुलाच्या माध्यमातून जिल्ह्यात राष्ट्रीय व आतरंराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत, यासाठी क्रीडा संकुलात अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याची क्षमता चंद्रपूर जिल्ह्यात आहे. त्यासाठी उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा खेळाडूंना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, असा विचार ना. श्री. मुनगंटीवार सदैव मांडत असतात. याच विचारातून त्यांनी पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलाच्या धर्तीवर चंद्रपूरमध्ये अत्याधुनिक बॅडमिंटन हॉल व्हावा, असा निर्धार त्यांनी केला.
जिल्हा क्रीडा संकुलातील अत्याधुनिक बॅडमिंटन हॉल अद्यावतीकरणाकरिता ना.मुनगंटीवार यांच्या विशेष प्रयत्नांतून जिल्हा नियोजन समितीमधून रु. 5 कोटी 39 लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला होता. राज्यात वातानुकूलित बॅडमिंटन हॉल पुण्यातील बालेवाडी नंतर हा चंद्रपूर जिल्ह्यात दुसरा आहे. या सर्वसुविधायुक्त हॉलचे उद्घाटन ना.मुनगंटीवार यांच्या हस्ते ९ सप्टेंबर २०२४ ला होणार आहे.
असा आहे बॅडमिंटन हॉल
बॅडमिंटन हॉलमध्ये वातानुकूलित यंत्रणा, 4 बॅडमिंटन कोर्ट्स करिता अमेरिकन मॅपल वुडन फ्लोरींग, योनेक्स कंपनीचे सिंथेटिक मॅट, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्यादृष्टीने प्रकाश झोताची व्यवस्था, 300 प्रेक्षकांची आसन व्यवस्था, अद्ययावत प्रसाधनगृहे, मुला-मुलींसाठी स्वतंत्र लॉकर्स, शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, फायर फायटिंगची व्यवस्था, सोलर सिस्टम, व्ही.आय.पी कक्ष, अद्यावत स्टेज, लायटिंगसह आकर्षक प्रवेशद्वार, सीसीटीव्ही, आदी सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. ================================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,