लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नेहमी जनहिताचे कार्य केले.सत्ता मिळाली तेव्हा अहोरात्र कार्यरत महाराष्ट्राच्या विकासाचा झंझावात केला.यात चंद्रपूर जिल्ह्यासाठीही मोलाची कामगिरी केली.त्यामुळे त्यांना देशातील सर्वोत्कृष्ट मंत्री म्हणून गौरविण्यात आले.अर्थमंत्री म्हणून असतांना सर्वच क्षेत्राचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न केला म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात त्यांची विकास पुरुष म्हूणून ओळख निर्माण झाली.आता पुन्हा त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे.मंत्रिमंडळाच्या यादीत आ.मुनगंटीवार यांचे नाव अग्रस्थानी आहे.त्यांचे मंत्रीपद त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या विकास कामांची पावती होय,असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केले.ते भारतीय जनता पार्टी महानगर तर्फे लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा जल्लोष करताना मंगळवार 9 ऑगस्टला बोलत होते.
लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार यांनी आज 11 वाजता मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर जल्लोष कार्यक्रम
महानगरातील पाचही मंडळात आयोजित करण्यात आला.गांधी चौक, जटपूरा गेट,बंगाली कॅम्प चौक,मातोश्री विद्यालय तुकुम,नेताजी चौक बाबुपेठ येथे सर्व कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतषबाजी करीत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष केला.यावेळी मिठाईचे वितरण करण्यात आले.यावेळी संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,महामंत्री सुभाष कासनगोट्टवार,ब्रिजभुषन पाझारे,रवींद्र गुरनुले,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,माजी महापौर राखी कंचर्लावार,माजी उपमहापौर राहुल पावडे,माजी स्थायी समिती सभापती संदीप आवारी,मोर्चा अध्यक्ष विशाल निंबाळकर,महिला मोर्चा अध्यक्षा अंजली घोटेकर, भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडू,अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,संदीप आगलावे,विठ्ठल डुकरे,दिनकर सोमलवार,रवी लोणकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.