*मुलं तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान; तातडीने नुकसान भरपाई द्या: मनसे तालुका अध्यक्ष स्नेहल झाडे*

0
20

================================          *मनसेच्या तिव्र आंदोलनाचा कदम इशारा, नुकसानग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रशासनाला दिले निवेदन*   ===============================

मुलं तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांचे आणि जीवनमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत गरीब नागरिकांच्या जीवनात संकट निर्माण झाले आहे, आणि अद्यापही अनेक कुटुंबे नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) मुलं तालुका अध्यक्ष स्नेहल झाडे यांच्या नेतृत्वात प्रशासनावर त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आज तहसील कार्यालय मुल येथे मा. तहसीलदार साहेबांना दिलेल्या निवेदनाद्वारे, झाडे यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या या मोठ्या आपत्तीमुळे अनेक गरीब कुटुंबे जीवनावश्यक गोष्टींना मुकली आहेत. काही नागरिकांना नुकसान भरपाई मिळाली असली तरीही, अनेकांचे प्रकरणं अद्याप प्रलंबित आहेत. कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता, सर्व नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे झालेल्या या संकटात प्रशासनाने त्वरित कार्यवाही करण्याची गरज आहे. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना अशा प्रसंगात अधिक मदतीची आवश्यकता असते. परंतु, प्रशासनाने काहींना मदत दिली तर काहींना दुर्लक्ष केले आहे, असा आरोप मनसेच्या नेत्यांनी केला आहे. मनसेच्या जिल्हा सचिव श्री किशोर मडगुलवार व जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांच्या मार्गदर्शनात, हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या संकटाचा सामोरा जात असलेल्या नागरिकांसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा थेट इशारा झाडे यांनी दिला आहे.
स्नेहल झाडे आणि मनसेच्या इतर पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या या निवेदनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे. या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करणे अपेक्षित आहे. सर्व नुकसानग्रस्तांना न्याय देण्यासाठी प्रशासनाने तत्काळ हालचाल करणे गरजेचे आहे, अन्यथा मनसेकडून आंदोलन होईल, ज्याची जवाबदारी पूर्णपणे प्रशासनाची असेल.
मुलं तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीची त्वरित भरपाई देण्याची मागणी मनसेच्या तालुका अध्यक्ष स्नेहल झाडे यांनी व मनसे चे कार्यकता अक्षय वाकडे अजय कटलावार गणेश गुरुनले सुरर देशमुक प्रेमीला नवरकर रंजना कमडी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे मागणी केली. यामध्ये प्रशासनावर कोणत्याही प्रकारचा दुजाभाव न करता सर्व नुकसानग्रस्तांना मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.    ==================================          *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*                                    =================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here