===============================
*आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून संतोष रावत यांच्या नावाची चर्चा!*
चंद्रपूर(नि.वि.प्र.): बल्लारपूर- मुल विधानसभा क्षेत्रातून आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेसचे उमेदवार म्हणून संतोष राहत यांच्या नावाची चर्चा मतदार राजा मध्ये फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे कारण की मागील दोन दशकापेक्षाही जास्त काळापासून ते काँग्रेसचे प्रमाणिक नेता कार्यकर्ता म्हणून सर्व परिचित आहे. सध्याचे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चे अध्यक्ष या पदावर कार्यरत असून ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील सर्व सामान्य नागरिक ही त्यांच्या योग्य अशा कार्यप्रणालीमुळे उमेदवार असावा तर संतोष रावत जसा असे सुद्धा बोलू लागले आहे.
बल्लारपूर मुल विधानसभा क्षेत्राकरिता आपल्याला काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून अनेक लोकांनी आपली दावेदारी केली आहे.
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रतिभाताई धानोरकर ह्या लक्षणीय मताने विजयी झाल्याने व हा निकाल पाहता सर्वच हौसे – गौशे- नौशे बल्लारपूर मुल विधानसभा मधून आपण निवडून येणार असेच स्वप्न देखील पाहत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये याचे कारण असे की अनेकांनी बल्लारपूर मुल विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मिळावी म्हणून आपला उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाकडे सादर केला आहे.
बल्लारपूर मुल विधानसभा क्षेत्राची भाजपाची उमेदवारी चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाच मिळणार असे पूर्णपणे विश्वासाने बोलले जात आहे म्हणजे बोलण्याचे तात्पर्य आहे की जर भाजपाची उमेदवारी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मिळाली तर विधानसभेच्या या निवडणुकीत काट्याची टक्कर होणारच यातील तीळ मात्र शंका नाही अशी माहिती विश्वसनीय सूत्राद्वारे मिळाली असून भाजपाचे उमेदवार म्हणून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याशी महाविकास आघाडीच्या उमेदवाराशी थेट लढत होऊ शकते अशी चर्चा संपूर्ण विधानसभा क्षेत्रात होत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहिल्यास काँग्रेस पक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यापैकी कोणाच्या कार्यकर्त्याला ही उमेदवारी मिळणार! असे देखील बोलले जात आहे परंतु हे अजून जरी निश्चित झाले नाही तरीही जवळपास बल्लारपूर मुल विधानसभा क्षेत्रातील उमेदवारी काँग्रेस पक्षाला मिळणार असे विश्वास काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेंद्र वैद्य तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदीप गिऱ्हे यांच्याही नावाची उमेदवार म्हणून चर्चा आहे.
बल्लारपूर मुल विधानसभा क्षेत्रातून यावेळी बल्लारपूर मधून उमेदवारी न देता मुल तालुक्यातील उमेदवाराला काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिल्यास संतोष रावत यांचे नाव गटबाजीचे राजकारण न झाल्यास ? समोर येणार याच्यात मात्र शंका नाही! असे देखील बोलले जात आहे. कारण की संतोष रावत मागील अनेक वर्षापासून या निर्वाचन क्षेत्रात सक्रियरिता कार्य करीत असून त्यांनी अनेक अशी आंदोलने करीत जनसामान्यांना न्याय मिळवून दिला आहे हेही मात्र तेवढेच खरे!
बल्लारपूर मुल विधानसभा क्षेत्रातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून अनेकांनी अर्ज दाखल केलेले आहे त्यापैकी रोशनलाल बिट्टू, डॉक्टर विश्वास झाडे, प्रकाश पाटील मारकवार, डॉक्टर अभिलाषा गावतुरे सह अनेक नावाची चर्चा या विधानसभा क्षेत्रात केली जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठ्या प्रमाणात यश मिळणार असे भाकीत ही अनेक बुद्धिजीवी वर्गाकडून केले जात आहे. परंतु त्यासाठी काँग्रेसचा उमेदवार ही पूर्णपणे सक्षम असला पाहिजे शहरी भागासह ग्रामीण भागात ही त्याचे जनसंपर्क असले पाहिजे व यावेळी ग्रामीण भागातून काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास बल्लारपूर मुल विधानसभा क्षेत्रातून काँग्रेस पक्षाचा उमेदवारच भाजपाच्या उमेदवाराला जोरदार लढत देऊ शकतो. असेही बोलले जात आहे, म्हणूनच आगामी विधानसभा निवडणुकीत संतोष रावत यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाल्यास आगामी निवडणुकीत या विधानसभेत भाजपाचा ह्या बालेकिल्ल्यावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकणार? असे विश्वास ही व्यक्त केले जात आहे.
संतोष रावत यांचा जनसंपर्क तसेच काँग्रेस पक्षासोबत असलेला प्रमाणिकपणा ही त्यांची जमेची बाजू असून व या विधानसभा क्षेत्रात त्यांनी अनेक आंदोलने उभारून, अनेक कार्यक्रम घेऊन पक्षाला बळकटी प्रदान करण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे हे सर्व विदित असल्याने व ग्रामीण भागात तसेच शहरी भागातील मतदार राजा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कार्यामुळे व काँग्रेस पक्षासोबत असलेल्या प्रामाणिकपणामुळे संतोष रावत यांनाच काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी असे मत व्यक्त करीत आहे. आता पुढे पुढे पाहू होणार तरी काय? काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून नेता शोधणार कोण कोणते उपाय! ================================ *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,