================================
**ब्रिजभूषण पाझारे यांची मुंबईत चंद्रपूर विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी: श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक**
मुंबई: आज मा. खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांची मुंबईत भेट घेऊन चंद्रपूर विधानसभेबाबत सविस्तर माहिती सादर करण्यात आली. ब्रिजभूषण पाझारे यांनी विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी केली आहे. चंद्रपूर विधानसभा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे, आणि या विधानसभेत ब्रिजभूषण पाझारे यांनी अनेक वर्षांपासून विविध पदांवर काम केले आहे. समाजकल्याण सभापती, जिल्हा परिषद सदस्य, आणि पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी या क्षेत्रात कार्यरत राहून जनतेच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या सर्व कार्यकाळात, चार वेळा निवडणुका लढवून विजय प्राप्त करून, त्यांनी समाजाच्या सेवेसाठी कायमच तत्पर राहण्याचा ध्यास घेतला आहे.
ब्रिजभूषण पाझारे यांचा अनुभव आणि कार्यकाळातील यशाचा विचार करून भारतीय जनता पार्टीकडून आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. आपल्यासारख्या अनुभवी नेतृत्वाने यावर विशेष लक्ष द्यावे, असे ते मानतात. यासाठी, मा. मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे त्यांच्या उमेदवारीसाठी प्रस्ताव पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील अनेक समस्या आजही प्रलंबित आहेत. विकासकामे थांबली आहेत, काही कामांवर योग्य निर्णय घेतला गेलेला नाही आणि जनतेच्या अनेक समस्यांची सोडवणूक झालेली नाही. ब्रिजभूषण पाझारे यांची उमेदवारी निश्चित झाल्यास, त्यांनी या प्रलंबित विकासकामांना चालना देण्यासाठी आणि चंद्रपूरच्या जनतेच्या सेवा-सुविधांमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी सर्वोत्तम योगदान देण्याचे वचन दिले आहे.
माझ्या कामातील निष्ठा आणि सेवाभाव यामुळे मी जनतेच्या विश्वासाला पात्र ठरलो आहे, आणि माझ्या नेतृत्वात चंद्रपूर विधानसभेत एक सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळावी, अशी अपेक्षा आहे. या वेळी खासदार श्रीकांतजी शिंदे यांनी दिलेल्या वेळामुळे आणि घेतलेल्या सविस्तर चर्चेमुळे मला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे. मी माझा संपूर्ण बायोडाटा त्यांच्या पुढे सादर करून माझ्या कार्यकाळातील अनुभव आणि यशाचे विवरण दिले आहे.
मी पुन्हा एकदा आपणास विनंती करतो की, आपण माझ्या उमेदवारीचा विचार करून पक्षाच्या अधिकाऱ्यांपर्यंत माझी मागणी पोहोचवावी, जेणेकरून चंद्रपूर विधानसभेतील विकासप्रक्रियेचे नवे पर्व सुरू करता येईल. जनतेच्या विश्वासाला आणि त्यांच्या आशा-आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी मला एक संधी द्यावी, हीच माझी अपेक्षा आहे. या बैठकीमध्ये डॉक्टर मंगेश जी गुलवाडे महामंत्री भाजपा व श्री सुरज पेंदुलवार महामंत्री भाजपा व श्री प्रज्वल जी कडु महामंत्री भाजपा राकेश बोमावर उपस्थित होते, ================================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =================================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,