*खेमराज भाऊ नेवारे हे शेतकऱ्यांसह इटीयाडोह पाटबंधारे उपविभागावर आक्रमक.*

0
13

================================

देसाईगंज तालुक्यातील मौजा कोकडी /तुळशी या गावात भातशेती मोठ्या प्रमाणात होते. निसर्गाच्या पाण्यावर बहुतेक शेती पिकविली जाते मात्र कोकडीच्या शेतकऱ्यांसाठी बाघ ईटियाडोह सिंचन प्रकल्पांतर्गत जुना फरी मायनर कालवा तयार करण्यात आले व त्याद्वारे शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येत होते.परंतु मागील दोन तीन वर्षांपासून खालच्या भागातील शेतकऱ्यांना कोरडा दुष्काळ सहन करावा लागत आहे.याचे मुख्य कारण म्हणजे दुसऱ्या मार्गाने मुख्य कालव्याला जोडून दुसरा फरी मायनर कालवा तयार करण्यात आला त्यामुळे जुना फरी मायनर कडे मात्र इटियाडोह सिंचन उपविभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कालव्यात कचरा जमा झाला आहे. जागोजागी काठावर मोठे खड्डे तयार झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना यापासून धोका होण्याची शक्यता आहे तसेच वनविभागांतर्गत नर्सरीतून येणारे पाणी सिमेंट पाईप उंच असल्याने पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होतो.
तेव्हा जुना फरी मायनर ची साफ सफाई करणे, कालव्याची दुरुस्ती करूणे,पाईप ची उंची कमी करून त्यावर सिमेंटीकरण करणे तसेच संपूर्ण कालव्याचे सुद्धा सिमेंटीकरण करण्याची मागणी उपविभागीय अधिकारी बाघ इटियाडोह सिंचन उपविभाग देसाईगंज यांना खेमराज भाऊ नेवारे यांनी निवेदनाद्वारे केली.
गेल्या 2 वर्षांपासून जिल्ह्यापर्यंत शासना सोबत सतत पत्रव्यहार करूनसुद्धा शेतकऱ्यांच्या मागणीकडे संपूर्ण यंत्रणा दुर्लक्ष करीत आहे. यावेळेस पत्र देऊनही मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा खेमराज भाऊ नेवारे यांनी दिला.
याप्रसंगी खेमराज भाऊ नेवारे यांचे सोबत कार्तिक टिकले, लक्ष्मण मस्के, प्रकाश हुमणे, रामकृष्ण सहारे, ईश्वर सहारे, अशोक वाटगुरे,गोपाल मस्के, विनोद सहारे, नरेश वासनिक, योगेश नेवारे व कोकडी येथील समस्त शेतकरी उपस्थित होते.      =================================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*     ================================            कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here