==============================
*राजुरा येथे चुनावी दंगल महासंग्राम संपन्न.*
================================
नवभारत नवराष्ट्र दैनिक वृत्तपत्र समूहाकडून छत्रपती शिवाजी महाराज सुपर मार्केट संकुल राजूरा येथे राजुरा विधानसभा क्षेत्रासाठी चुनावी दंगल अब होगा महासंग्राम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी आजी-माजी, विद्यमान आमदार, येत्या विधानसभा आमदारकीच्या निवडणूकसाठी असणारे नवीन चेहरे यांना एकत्रित करून आपण केलेल्या कामाचा व आपण पुढे काय करणार याबाबतचे चित्र स्पष्ट करण्यासाठी सदरची चुनावी दंगल घेण्यात आली होती. याप्रसंगी लोकांच्या समस्या , प्रश्न यावर सुद्धा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून चर्चा करायची होती. माजी आमदारांपैकी जेष्ठ दोन आमदारांच्या त्या कार्यक्रमात सहभाग लागला त्यांनी केलेले पूर्वीचे कामे याबाबत माहिती दिली आणि आगामी निवडणुकी नंतर ते काय करणार आहेत यावर आपले स्पष्टीकरण देत त्यांनी काम आहे असे सांगून मंच सोडला. लोकांचे प्रश्न तसेच राहून गेले लोकांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आजी-माजी किंवा विद्यमान आमदार कोणीही नसल्यामुळे येत्या निवडणुकीत असणारी नवीन चेहरे यांच्याकडून लोकांच्या काय अपेक्षा असाव्यात यावर चर्चासत्र रंगले नवभारत नवराष्ट्र टीमने या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले व हा कार्यक्रम उत्कृष्टरित्या घडवून आणण्याचा मान राजुरा वासियांना मिळून दिला. राजुरा संकुलात राजुरा विधानसभा क्षेत्रात अशी चर्चा रंगत आहे की आत्या जुन्या आमदारांनी सेवानिवृत्त व्हावं आणि नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी तसेच घराणेशाहीच्या परंपरा यावर प्रतिबंध लागला पाहिजे. तसेच राजुरा क्षेत्रात कंपन्या कारखाने औद्योगिक क्षेत्राचा चांगला विस्तार असल्यामुळे साखर तेथे मुंगी याप्रमाणे बाहेरील नवीन चेहरे काही स्वयंघोषित पदार्पण करीत आहे . पक्षाची वरच्या स्तरावर युती झालेली असून ते घोषित होण्याआधीच नवीन चेहरा स्वयंघोषणा देत आहे त्यामुळे हे लोक पक्षासोबत बंडखोरी करतील की पक्षाचा आदेश सर्व मान्य ही भूमिका घेतील की फिर नया घर असे घर बनवते बदलतील यावर जनतेचे लक्ष लागलेले आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका प्रतिनिधी कोरपना राजुरा नवभारत नवराष्ट्र संपूर्ण टीम तसेच जिल्हाप्रमुख संजय तायडे यांच्या उपस्थितीत सदरचा कार्यक्रम पार पडला. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =================================== कार्यकारी संपादक श्री शशिकांत मोकाशे
संपादक :- शशि ठक्कर , 9881277793,9022199356
उपसंपादक:- विनोद शर्मा , वरोरा। 9422168069,