==============================
शहरातील विविध बुद्ध विहार कमेटीच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन
=============================
तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेली करुणा, अहिंसा, आणि समतेची शिकवण आपल्या जीवनात आणि समाजात प्रकाश पेरणारी आहे. मतदारसंघातील बुद्ध विहारांमधून आता शिक्षणाचा संदेश जावा या हेतूने आपण १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिकांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. एकाच मतदारसंघाती १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका असणारे चंद्रपूर कदाचित राज्यातील पहिले मतदारसंघ ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. =============================== महाकाली कॉलरी येथील आनंद बौद्ध महिला सेवा समिती, भिवापूर येथील करुणा बुद्ध विहार आणि तक्षशिला बुद्ध विहारांच्या वतीने स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आनंद बौद्ध महिला सेवा समितीच्या वतीने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजप महिला महानगर अध्यक्षा सविता कांबळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, कल्याणी किशोर जोरगेवार, सायली येरणे, भाग्यश्री हांडे, नंदा पंधरे, अमोल शेंडे, ताहिर हुसेन, विमल कातकर, नीलिमा वनकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, मागील पाच वर्षांत मी सतत आपल्या संपर्कात होतो. ही गर्दी याचेच फलित आहे. सर्व समाजाचा सर्वसमावेशक विकास हेच आपले ध्येय राहिले आहे. आपण बाबुपेठ येथे भव्य विपश्यना केंद्र तयार करत असून हे केंद्र विदर्भातील उत्तम केंद्रांपैकी एक असणार आहे. मतदारसंघातील १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिका तयार करण्याच्या दिशेने आपले प्रयत्न होते. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने यात यश आले आहे. १६ बुद्ध विहारांमध्ये अभ्यासिकांसाठी आपण साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला असल्याचेही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.
आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी बुद्ध विहारांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे. येथे केवळ आध्यात्मिक बळच मिळत नाही, तर सामाजिक आणि मानसिक बळही मिळते. आपल्या समाजातील नवीन पिढीने या शिकवणीचा आदर करून एक उत्तम समाज घडवावा. तथागत गौतम बुद्धांनी दिलेल्या विचारांचा प्रसार करून समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या आपल्या प्रयत्नात आमचे नेहमी योगदान राहील, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. ============================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*