================================
*”बालविवाह मुक्त भारत अभियान ” शुभारंभ माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात *
*चंद्रपूर*
दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोज बुधवारला सकाळी 10.30 मा. महिला व बाल विकास मंत्रालय नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात शपथ विधीचा सोहळा संपन्न् त्याच औचीत्याने भारतभर ठिकठिकाणी जिल्हा व ग्रामिन स्तरावर जिल्हा महिला व बाल विकास विभाग अंतर्गत, जिल्हा बाल संरक्षण कक्ष व असेस्ट टु जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्प चंद्रपूर येथे भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात बालविवाह मुक्त अभियान शपथ विधी व रॅलीचे आयोजन करुन कार्यक्रम संपन्न् करण्यात आला.
या प्रसंगी अध्यक्ष म्हणून श्री विवेक जॉन्सन मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प.चंद्रपूर, तर प्रमुख अतिथी म्हणून सुमित जोशी सर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण चंद्रपूर, श्रीमती क्षमा बासरकर मॅडम, अध्यक्ष बालकल्याण समिती चंद्रपूर, श्रीमती भावना देशमुख बाल न्याय मंडळ सदस्य, श्री काशिनाथ देवगडे सर संचालक रुदय संस्था गडचिरोली , श्री अजय साखरकर सर, श्री दिवाकर महाकाळकर परिवेक्षण अधिकारी जिल्हा महिला बालविकास विभाग , श्री मोरेश्वर झोडे जिल्हा परिषद अधिकारी जिल्हा महिला बालविकास विभाग, श्रीमती वाकडे मॅडम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर, श्रीमती गीता चौधरी पंचायत विभाग चंद्रपूर शाळेचे प्राचार्य सी.डी. तन्नीरावार सर, उपमुख्याध्यापक श्री जे.एम टोंगे सर, पर्यवेक्षक श्रीमती मुप्पिडवार मॅडम, श्री डी. एल कुरेकार सर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय प्रतिनिधी, टाइम्स 24 न्यूस संपादक राज मेश्राम हे मान्यवर मंचावर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक जोशी साहेब यांनी बालविवाहाचे भारतातील वय या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. मा. काशिनाथ देवगडे, संचालक रुदय संस्था चंद्रपूर यांनी उपस्थित बालकांना मागदर्शन केले की देशातील बालविवाहाचे प्रमाण कमी व्हावे तसेच देशात बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जॉन्सन सर यांनी बालविवाह रोखण्यासाठी समाजामध्ये जाणीव जागृतीची गरज आहे यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाला मा. बाल न्याय मंडळ मा. बाल कल्याण समितती, मा. शिक्षण विभाग प्राथमिक /माध्यमिक मा. पोलिस विभाग यांच्या उपस्थिती दर्शविली. सर्व मान्यवराच्या समक्ष बाल विवाह प्रतिबंध होण्यासाठी प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमा प्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा राजेश बारसागडे सर ह्यांनी तर आभार श्री शशिकांत मोकाशे सर ह्यांनी मानले. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*