=================================
*भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पॅथोलॉजी मशीन उपलब्ध करण्याची आम आदमी पार्टी तर्फे निवेदनातून मागणी*
भद्रावती ग्रामीण रुग्णालयात पॅथोलॉजी मशीन उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे. सध्या रक्ताच्या नमुन्यांची चाचणी वेळेवर होत नसल्यामुळे रक्त तपासणी अहवाल मिळण्यास 4 ते 5 दिवसांचा विलंब होतो. यामुळे रुग्णांवर उपचार सुरू करण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. विशेषतः आपत्कालीन परिस्थितीत याचा रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर परिणाम होत आहे.
या समस्येवर उपाय म्हणून आम आदमी पार्टीने भद्रावती ग्रामीण रुग्णालयात त्वरित पॅथोलॉजी मशीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. आज आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा यांच्या नेतृत्वात यासंदर्भात अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले.
आम आदमी पार्टीची मागणी:
1. भद्रावती ग्रामीण रुग्णालयासाठी त्वरित पॅथोलॉजी मशीन उपलब्ध करून देण्यात यावे.
2. रुग्णांना वेळेत चाचणी अहवाल मिळावा यासाठी यंत्रणा मजबूत करण्यात यावी.
3. भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करावी.
आम आदमी पार्टीचे स्थानिक नेते आणि कार्यकर्ते यासाठी शासनावर दबाव टाकत असून, रुग्णांच्या हितासाठी हे पाऊल अत्यावश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे. यावर येत्या 7 दिवसात तातडीने कार्यवाही झाली नाही, तर पुढील आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, भद्रावती शहर अध्यक्ष अनिल कुमार राम, युवा शहर अध्यक्ष रोहन गज्जेवार, रितेश नगराळे, ओम पारखी, विशाल डोळस, सचिन मून व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*