===============================
नकोडा येथील अतिक्रमण करून घरे बांधणाऱ्या ८४ कुटुंबांना सवलत द्या – आ. किशोर जोरगेवार
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत केली मागणी
==============================
नकोडा येथील शासकीय जागेवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या ८४ कुटुंबांना न्यायालयीन आदेशाचा संदर्भ देत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या संदर्भात ५ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयात विशेष बैठक झाली. या बैठकीत नागरिकांनी प्रशासनाच्या कारवाईविरोधात आक्षेप नोंदवला. या कुटुंबांची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्वरित कारवाई न करता त्यांना सवलत देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्याकडे केली आहे. ============================= आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेत चंद्रपूर मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा केली. या चर्चेदरम्यान नकोडा येथील ८४ कुटुंबांना सवलतीची मागणी त्यांनी केली. या बैठकीत माझी नगर सेवक सुभाष कासनगोट्टूवार, मनोज पाल, गणपत गेडाम यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नकोडा येथील नागरिक उपस्थित होते. ============================= नकोडा येथील सर्वे क्र. ५८ आराजी ५.२९ पैकी ६१६ चौ. मी. शासकीय जागेवर निवासी व वाणिज्य प्रयोजनार्थ अतिक्रमण झाल्याचे आढळून आले आहे. यामुळे तहसील प्रशासनाने या कुटुंबांना नोटिसा बजावल्या आहेत. नोटिसांमध्ये सात दिवसांच्या आत अतिक्रमण स्वतःहून हटवण्याचा इशारा देण्यात आला आहे. अतिक्रमण न हटविल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ अंतर्गत प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटवण्याची कार्यवाही होईल, असे नमूद आहे. ================================ आ. किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की, नकोडा येथील ८४ कुटुंबे आर्थिक दृष्ट्या अतिशय गरीब असून त्यांच्याकडे इतरत्र घरे बांधण्यासाठी जागा नाही. या कारणास्तव, या कुटुंबांना शासकीय जागेवरील अतिक्रमणाबाबत सवलत देऊन त्यांची इतरत्र योग्य व्यवस्थापन करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. ================================= *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================= कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*