==============================
भद्रावती च्या पंकज इटकेलवार चे आंतरराष्ट्रीय चित्र प्रदर्शन दुबईत .
—————————————-
इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल खजुराहो२०२४-२०२५ दिनांक
५-११ डिसेंबर ला आयोजित कार्यक्रमात देखील पंकज इटकेलवार यांना आमंत्रित
—————————————- चंद्रपुर , ============================== सुभद्रा आर्ट गैलरी भुवनेश्वर आणि दुबई ओडिया समाज द्वारे आयोजित इंटरनेशनल आर्ट सेंटर, जुमेराह दुबई येथे दि. ९ ते ११ नोव्हेम्बर २०२४ पर्यंत मोदी@२० या आंतर्राष्ट्रिय चित्र- शिल्प प्रदर्शनी व कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील आदिवासी हस्तकला व चित्रकला केंद्राचे व कलाअकादमीचे माजी विद्यार्थी अद्यावत प्रसिद्ध नामवंत चित्रकार प्रा. पंकज इटकेलवार यांना आयोजका तर्फे आमंत्रित केले होते. शासकीय कला व अभिकल्प महाविधालय नागपुर येथील प्रा. पंकज इटकेलवार, सोबतच् भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, ओडिसा, आसाम, त्रिपुरा येथील एकुन् ४०कलावंत सहभागी झालेत. “भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिरदितील २० वर्षे ” या विषयावर आधारित चित्र व शिल्प या प्रदर्शनी मधे प्रदर्शित केली होती. यामधे पंकज यांची ” हंगरी क्रो ” आणि ” मोदी विथ सोशल चेंज ” ही दोन चित्रे प्रदर्शित झाली . यु.ए. ई. सारख्या देशात जावून आपल्या खास वैदर्भीय शैलिनी तेथील जनतेची मने जिंकलि. सात दिवसांच्यl या चित्र प्रदर्शन व कार्यशाळेत सहभागी होवून नागपुर कला शैलीचे प्रतिनिधित्व केल्याने शासकीय कला व अभिकल्प महाविधालयचे अधिष्ठाता प्रा.डॉ. विश्वनाथ साबले यानी आनंद व्यक्त केला असुन चित्रकारचे अभिनंदन केले आणि पुढील कलाप्रवासा करीता शुभेच्छा दिल्या आहेत. हे प्रदर्शन येत्या तीन वर्षाच्या आत आणखी दहा देशात प्रदर्शित होणार आहे असेअयोजकानी आस्वसन दिले आहे. या प्रदर्शनी व कार्यशाळेचे उद्घघाटन मुख्य सचिव, साहित्य व संस्कुती विभाग, ओडिसा राज्य श्री बिष्णुपद सेठी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी सुभद्रा आर्ट गैलरीचे प्रमुख श्री सूर्य रथ, गैलरी चे संचालक श्री अशोक नायक, सूर्यखित्र फाउंडेशन चे प्रमुख श्री बीपीन मिश्रा, दुबई इंटरनाशनल आर्ट सेंटर च्या प्रमुख द्याली भल्ला, दुबई ओडिया समाज चे अध्यक्ष श्री अमेय मिश्रा, डॉ. कुलमनी बिसवाल व दुबईतील जेष्ठ चित्रकार अंजनि लायतु, काझी मो. राघीव इत्यादि उपस्थित होते. दिनांक ५ ते ११ डिसेंबर ला आयोजित इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल खजुराहो२०२४-२०२५ करिता देखील प्रा. पंकज इटकेवार यांची निवड करण्यात आली असून कला व चित्रकार आविष्कार प्रदर्शित करणार असून महाराष्ट्राचे नेतृत्व करणार आहेत हे विशेष बाब आहे . =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* =============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*