==================================
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीप्रसंगी जल्लोषपूर्ण स्वागत
_____________________________
*चंद्रपूर* ========================
आज महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक महत्त्वाचा दिवस ठरला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे व अजितदादा पवार यांनी शपथ घेतली. या ऐतिहासिक प्रसंगी भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून चंद्रपूर जिल्ह्यासह महाराष्ट्रभर जल्लोषात स्वागत करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील पाच विधानसभेच्या मतदारसंघांतून महायुतीचे डॉ. सुधीर मुनगंटीवार,किशोर जोरगेवार, बंटी भांगडिया,देवराव भोंगळे,करण देवतळे हे उमेदवार विजयी झाले आहेत. या यशस्वी नेतृत्वामध्ये आदरणीय सुधीर मुनगंटीवार व हंसराज भय्या अहिर यांच्या मार्गदर्शनाची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी समर्पित काम केले आहे. भाजपच्या वतीने व महायुतीच्या वतीने चंद्रपूर येथून पाचही विजयी आमदारांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या आणि लोकसंग्रहाच्या जोरावर मतदारांचा विश्वास संपादन केला आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला राज्याच्या प्रगतीत एक महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळाली आहे. सुधीर मुनगंटीवार साहेबांनी कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, “महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने कार्य करावे. आपल्या जिल्ह्याचा प्रगतीचा मार्ग सुकर होईल आणि राज्याचा विकास वेगाने होईल.” ============================ भाजप व महायुतीचे कार्यकर्ते राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहतील. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. ============================= महाराष्ट्रातील जनतेच्या विश्वासाने महायुती सरकार स्थापन झाले आहे. या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राला एक नवा विकासाचा अध्याय मिळेल, असा दृढ विश्वास आहे. ============================ या जल्लोषामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे माजी महानगर अध्यक्ष तथा जिल्ह्याचे महामंत्री डॉ.मंगेश गुलवाडे, विजय राऊत,खुशाल बोंडे,प्रकाश देवतळे, प्रकाश धारणे,सुभाष कासनगोट्टूवार, संदीप आवारी, संजय कांचरल्लावार, रवीआसवणी,विशाल निंबाळकर,नम्रता ठेमसकर,छबुताई वैरागडे,मनोज पाल,किरण बुटले ,रवी लोणकर,राकेश बोमनवार,मुग्धा खांडे,तृष्णा गेडाम उपस्तित होते.. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ================================ कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*