=============================
चंद्रपूर जिल्ह्यांनी भाजपाला दिले यावेळी पाच आमदार, त्याची परिणीती जिल्ह्याला शून्य मंत्री; जनसामान्यांमध्ये नाराजीचा सूर
*चंद्रपूर*
चंद्रपूर हा आदिवासी, प्रदूषणग्रस्त, नक्षलग्रस्त जिल्हा तद्वतचं गडचिरोली जिल्ह्याची हीच अवस्था परंतु वर्तमान सरकारने जणू राजकीय आकसं म्हणून पूर्वीच अनेक विधी संकटांना तोंड देत अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न रेंगाळत असतांना नजदीकच्या काळात कायदा-व्यवस्था ढासळली असतांना, तद्वतचं रोजगाराची गंभीर समस्या, वाढती महागाई, विद्युत उत्पादन करून व प्रदूषण सहन करून सुद्धा महागड्या दरात वीज घेणारा हा जिल्हा विशेषतः जिल्ह्याची चौफेर आरोग्य व्यवस्था ढासळली असतांना, तद्वतचं अपघात व आत्महत्यांचे प्रकरणात झालेली वाढ जिल्ह्यातील बहुतांश अधिकाऱ्यांवर प्रशासनाची पकड सुटल्याने जनसामान्यांचे प्रश्न प्रत्येक विभागात रेंगाळत असून शासनाची ढासळलेली आर्थिक व्यवस्थेमुळे जिल्ह्याच्या विकासास खीळ बसली असून अनेक विभागांमध्ये निधी नसल्याची बोंबाबोंब सुरू असून शासनाच्या स्वस्त धान्याच्या दुकानांमध्ये निशुल्क च्या नावाने वितरित केले जाणारे अनियमित तेही सडलेले, कुजलेले धान्य अशा गंभीर परिस्थितीत चंद्रपूर शहराची अमृत योजना कृतिशील पूर्ण झाली नसतांनाही ती पूर्ण झाल्याचे बाह्य वलय तत्कालीन मुंबई सरकारच्या दबावामुळे निर्माण केल्या जात असतांनाही या जिल्ह्याने यावेळी सहापैकी पाच भाजपाचे आमदार निवडून दिले असतांना त्याचा वचपा त्या पाच आमदारांच्या रस्सीखेचामुळे जिल्ह्याला आधार म्हणून एकही मंत्री मिळू नये. तर अनेक जिल्ह्यांना तीन-तीन कॅबिनेट मंत्री देणाऱ्या या वर्तमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जणू या जिल्ह्यात खेळून बागडून तीन वेळा मुख्यमंत्री पद गाजविल्यानंतर जिल्ह्यांनी सात वेळा आमदार निवडून दिलेल्या व्यक्तीलाही संधी न देणे ही शोकांतिका म्हणावी लागेल. अशा परिस्थितीतही या सरकारचा तूर्तास निषेध न करता त्यांच्याकडे न्यायाची आर्त हाक चंद्रपूर-गडचिरोली जिल्हा विकास व समस्या निवारण समितीच्या १५ डिसेंबर रोजी सरदार हरविंदरसिंह धुन्नाजी यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या सभेत तीव्र भावना व्यक्त करून भारताचे पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्री तथा केंद्राचे रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री यांच्याकडे न्यायाची आर्त हाकं निवेदनाद्वारे केली आहे. =============================== *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.* ============================== कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*