*चंद्रपर जिल्हा बाल संरक्षण कक्ष व रुदय संस्था चे वतीने राजुरा येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांन साठी राबविले गेले विविध उपक्रम*

0
4

==============================

*चंद्रपर जिल्हा बाल संरक्षण कक्ष व रुदय संस्था चे वतीने राजुरा येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांन साठी राबविले गेले विविध उपक्रम*      ===============================              चंद्रपूर जिल्हा बाल संरक्षण कक्ष व रुदयसंस्थेच्या वतीने माध्यमिक आश्रम शाळा आदिवासी विकास विभागा तर्फे चालविली जाणारी राजुरा येथील आश्रम शाळेत विद्यार्थ्यांसाठी स्काऊट गाईड युनिट तर्फे अभिनव उपक्रम राबविण्यात येतो. प्रत्येक शनिवारी शाळा विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन किंवा स्पर्धांच्या आयोजन Star असते,                                 
त्या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलून मार्गदर्शन करण्यात येते. आज दिनांक 14/12/24 रोजी विद्यार्थ्यांना छोट्या व्यवसायातून मिळकत कसे मिळवता येईल यावर खाऊच्या स्टॉलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.                                                   
त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर सर तर या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री शशिकांत सर रुदय संस्था क्षेत्रीय अधिकारी लाभले. शाळा व्यवस्थापनाचा मोहितकर मॅडम मुख्याध्यापिका अध्यक्षस्थानी प्रमुख पाहुणे म्हणून प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री खोब्रागडे सर शाळा सुपरवायझर शाळा अधीक्षक व इतर मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते त्याप्रसंगी चाइल्ड हेल्पलाइन च्या प्रणाली इंदुरकर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष समुपदेशिका प्रिया पिंपळे, संरक्षण अधिकारी उंदीरवाडे मॅडम, बालकांचे जिल्हा बाल संरक्षण कक्ष विधी अधिकारी सचिन्‍द्र नाईक. यांची प्रामुख्याने उपस्थिती दुसऱ्या सत्रासाठी लाभली. सदर कार्यक्रमात श्री मोकाशी सर श्री अजय साखरकर यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करून इतर मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माननीय अजय साखरकर बाल संरक्षण अधिकारी यांनी मार्गदर्शनात बालकांना बालकांचे अधिकार व त्याची जाणीव करून दिली कोणत्या मार्गावर चालायचं ज्यामुळे जीवनात यश गाठता येईल समाजात चालणाऱ्या घडामोडी यापासून आपण संरक्षण कसं करायचं त्यासाठी अस्तित्वात असलेले टोल फ्री नंबर याबाबतची माहिती दिली.                   श्री मोकाशे सर यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा त्यावर असणाऱ्या पनिशमेंट कायदेशीर तरतुदी बालविवाहाचे दुष्परिणाम,बालविवाहाची कारणे, चांगला स्पर्श वाईट स्पर्श याचे प्रात्यक्षिक, घटना जवळच्या व्यक्तीकडूनच घडतात यावर बालकांचे अस्तित्वात असणारे कायदे आणि योजना यावर सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणात श्रीमती मोहितकर मॅडम प्राचार्य आश्रम शाळा यांनी मान्यवरांचे आभारही मानले व सदैव तत्पर असणाऱ्या बालकांसाठी कित्येक वर्षापासून सेवाभाववृत्ती बालकांचे सर्वतोपरी मार्गदर्शन त्यासाठी असलेली त्यांची आत्मियता हे पाहता श्री शशिकांत मोकाशे सरांना “”*पप्पाजी* “”या पदवीने संबोधित केले ज्याप्रमाणे आई-वडील मुलांची काळजी करतात त्याप्रमाणे बालकांच्या संदर्भात सदैव तत्पर असलेले व्यक्तिमत्व यापुढे त्यांना आम्ही पप्पाजी या नावानेच संबोधित करू असे त्यांचे प्रतिपादन करत या कार्यक्रमात सरते शेवटी आभार प्रदर्शन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खोब्रागडे सरांनी तर सूत्रसंचालन शाळा वर्ग शिक्षकांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी वर्ग सात ते वर्ग बारा पर्यंतच्या 400 विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बालविवाह मुक्त भारताची शपथ घेऊन बालकांनी बनवलेल्या अन्नपदार्थांच्या स्टॉलला विजीट करून त्यांच्या हाताच्या चवीचा आस्वाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .                 ===============================            *”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा ,व गढ़चांदूर, वरोरा तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*   ==============================              कार्यकारी संपादक :शशिकांत मोकाशे
*संपादक:- शशि ठक्कर, 9881277793, 9022199356*
*उपसंपादक:- विनोद येमलाल शर्मा, वरोरा। 9422168069*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here