खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार
चंद्रपूर : भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. विविध जाती, धर्म, परंपरा आणि संस्कृतींना जोडणारा दुवा म्हणजे सण आणि उत्सव. खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित भाऊच्या दांडीयात सर्वपक्षीय नेत्यांनी एका व्यासपीठावर हजेरी लावून एकात्मतेचा संदेश दिला.
चंद्रपूरचे खासदार बाळू धानोकर आणि वरोरा भद्रावती मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उत्सवात चंद्रपूर जिल्ह्यातील आणि शहरातील विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शवून दांडियाची शोभा वाढवली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, मनसे नेते दिलीप रामेडवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष राजीव कक्कड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तुकाराम पवार, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, माजी नगरसेवक राजुरा अरुण धोटे, माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, माजी नगराध्यक्ष वरोरा विलास टिपले, माजी नगरसेवक सचिन भोयर, विलास नेरकर, शिवसेना जेष्ठ नेते रमेश देशमुख, शिवसेना युवा नेते जयदीप रोडे, अमित उमरे, महिला तालुका अध्यक्ष गोंडपिपरी रेखाताई रामटेके, माजी सभापती पंचायत समिती राजुरा कुंदाताई जेनेकर, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य निलेश बेलखडे, डॉ. रंगनाथ कुलकर्णी, डॉ. सुशील मूंदडा, रमेश माकीजा यांची उपस्थिती होती.
यावेळी काँग्रेस शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर महिला काँग्रेस अध्यक्ष संगीत अमृतकर, महिला काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य – ठेमस्कर, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष सोहेल रजा, युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शंतनू धोटे, चंद्रपूर काँग्रेस तालुका अध्यक्ष श्याम थेरे, माजी नगरसेवक सुनीता अग्रवाल, ओबीसी नेते उमाकांत धांडे, रेल्वे उपभोक्ता सलाहकर समिती सदस्य राज यादव, सेवादल महिला पदाधिकारी स्वाती त्रिवेदी, राधिका तिवारी – बोहरा, सामाजिक सामाजिक कार्यकर्ता बसंत सिंग, ओबीसी जिल्हाध्यक्ष नरेंद्र बोबडे, माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, काँग्रेस युवा नेते कुणाल चहारे, काँग्रेस युवा नेते यश दत्तात्रय, पप्पू सिद्धीकी, माजी नगरसेवक प्रसन्न सिरवार, सुरज बोबडे, सिलावार यांची उपस्थिती होती.
या खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत ‘भाऊचा दांडिया’ उत्सवानिमित्त आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यात दोन चॅम्पियन्स ला ई दुचाकी, व रोख बक्षिसे देण्यात येणार आहे. चांदा क्लब ग्राउंडवर ५ ऑगस्ट २०२२ रोजीपर्यंत सायंकाळी सहा ते रात्रौ १० वाजता दांडियाची घूम राहणार आहे. यात दररोज वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत सहभागी होणार आहेत. या महोत्सवात उपस्थित राहण्याचे आवाहन बाळू धानोरकर मित्र परिवार चॅरिटेबल सोसायटी तथा मराठा चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.
*”हेलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
संपादक :- शशी ठक्कर 9881277793