* सुरजागड येथुन निघणारे लोहखनिज विदर्भाबाहेर विकण्यास बंदी घालणार आहात का? *

0
48

आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात उपस्थित केला उप

=======================

विदर्भात उद्योग लावत विदर्भातच लोहखनिज वापरण्याच्या अटीवर सुरजागड येथील लोह खनिज उत्खननाचे कंत्राट मिळवणारी कंपनी आता येथील 90 टक्के लोहखनिज विदर्भा बाहेर विकत आहे. हि गंभिर बाब असुन नियमांची पायमल्ली करणाऱ्या या कंपणीवर विदर्भाबाहेर बेकायदेशीर लोहखनिज विकण्यावर बंदी घालनार आहात का असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात बोलतांना उपस्थित केला आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यात मोठी खनिज संपत्ती आहे. मात्र येथील खनिज संपत्ती उत्खणन करणाऱ्या कंपणींवर अंकुश नसल्याने याचा कोणताही फायदा या जिल्ह्यांना झालेला नाही. या लोहखनिजावर आधारीत रोजगार वाढीसाठी कोणतेही छोटे उद्योग सदर जिल्ह्यांमध्ये उभे राहु शकले नाही. असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

घुग्घुस येथील लॉयड्स मेटल या कंपणीला लागणार्या लोहखनिजची गरज पूर्ण करण्या करिता  सुरजागड येथील खाण त्यांना देण्यात आली आहे.  यावेळी येथील लोहखनिज लॉयड्स मेडल कंपनीसह उर्वरित लोहखनिज विदर्भातील छोट्या उद्योगांना देण्याची अट घालण्यात आली होती. मात्र आता सदर लोहखनिज प्रकल्पातून निघाणारे केवळ 10 टक्के लोहखनिज येथे वापरल्या जात असुन 90 टक्के लोहखनिज विदर्भा बाहेर विकल्या जात आहे. त्यामूळे विदर्भात लोहखनिजावर आधारीत उद्योग वाढीस अडचण निर्माण झाली असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

सभागृहात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, विदर्भात मोठ्या प्रमाणात खनिज साठे आहे. आमच्याकडे कोळशाच्या खाणी आहे. सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्प सुरु आहे. विपूल प्रमाणात खनिज संपत्ती असुन सुध्दा विदर्भ मागास राहिला आहे. सुरजागडला असलेली खाण लॉयड्स मेटल या कंपणीला मिळाली आहे. मात्र येथुन निघणारे लोहखनिज येथे वापरण्यापेक्षा ते बाहेर विकण्यावर  अधिक भर दिल्या जात आहे. येथे उद्योग उभारण्यासाठी ही माईन्स सुरु करण्यात आली आहे.  मात्र केवळ 10 टक्के लोहखनिज वापरत बाकी 90 टक्के लोहखनिज विदर्भा बाहेर विकल्या जात आहे. या प्रकारावर सरकार बंदी आणणार आहे का असा प्रश्न आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात उपस्थित केला आहे. चंद्रपूर गडचिरोली येथे मोठे लोहखनिज प्रकल्प सुरु करत भिलईच्या धर्तीवर चंद्रपूर गडचिरोलीत स्टिलनगर करावे अशी मागणी यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली आहे.

लॉयड्स, गोपानी,  सिध्दबली आणि ग्रेस हे लोहखनिजावर आधारीत असलेले चार उद्योग चंद्रपूर मतदार संघात आहे. तसेच विद्युत निर्मिती करणारे प्रकल्पही चंद्रपूरात आहे. मात्र विद्युत निर्मिती करणाऱ्या धारीवाल कंपीनीची विज परवडत नाही म्हणून महाराष्ट्र शासन त्यांची विज विकत घेत नाही. परिणामी तो उद्योग तोट्यात आहे. तर त्याच्या लगत असलेला सिध्दबली उद्योगाला महाराष्ट्र शासनाची विज परवडत नाही म्हणून हा लोहखनिजावर आधारीत असलेला उद्योग बंद पडला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय गांभीर्याने घेत रोजगार वाढीसाठी लोहखनिजावर आधारित असलेल्या उद्योगांना सवलतीच्या दरात विज उपलब्ध करुन देण्याची मागणीही यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात केली आहे.

=========================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़चंदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

=====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here