*सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आयोजित सायकल मॅरेथाँनला आमदार किशोर जोरगेवार यांनी दाखविली हिरवी झेंडी…*

0
110

======================

२१ मार्च रोजी जागतिक वनदिवस साजरा केल्या जाणार आहे त्यानिमित्त सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आज १९ मार्च रोजी सायकल मॅरेथाँनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी हिरवी झेंडी दाखविल्या नंतर मॅरेथाँनला सुरवात झाली. यावेळी प्रकाश लोणकर, मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर वनवृत्त, जितेंद्र रामगावकर, वनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर, नंदकिशोर काळे उपसंचालक ( कोअर ) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर, अविनाश कुमार, उपवनसंरक्षक, वन अकादमी, चंद्रपूर, पियुषा जगताप, उपवनसंरक्षक, वन अकादमी, चंद्रपूर, शुभांगी चौव्हान, विभागीय वनाधिकारी, सामजिक वनीकरण, चंद्रपुर, विभागीय वनाधिकारी, वैभव राजूरकर, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष, पंकज गुप्ता, शहर संघटक, विश्वजित शहा, सूर्या अडबाले आदींची उपस्थिती होती.
२१ मार्च रोजी जागतिक वन दिवस साजरा करण्यात येतो त्या अनुषंगाने आज 19 मार्चला सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने सायकल मॅरेथाँनचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी सात वाजता वन अकादमी येथून सदर मॅरेथाँनला सुरवात झाली. चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मॅरेथाँनला हिरवी झेंडी दाखवली. त्यानंतर वन अकादमी जवळून निघालेली ही सायकल रॅली बल्लारशाह मार्ग डॉ. अब्दुल कलाम बाग येथून परत वन अकादमी येथे पोहचली व या मॅरेथॉनचा समारोप करण्यात आला. यात वन विभागाच्या कर्मचा-र्यांसह शहरातील अनेक सायकल स्वार यांनी सहभाग घेतला होता.

====================

*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*

,====================

संपादक :- शशी ठक्कर 9881277793

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here