======÷==============
* भद्रावती *
=============
आज दिनांक 5 एप्रिल रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे माननीय मुख्याधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले . निवेदनाचे कारण असे होते की भद्रावती शहरातील विविध वार्डांमध्ये काही वर्षांपासून पथदिवे लावण्यासाठी खंबे लावलेले पण अद्यापही त्या खंब्यांना नगरपालिकेतर्फे पथदिवे लावण्यात आलेले नाही. या विषयाचे निवेदन घेऊन त्वरित या खंब्यांना पथदिवे लावण्यात यावे तसेच खंब्यांना पथ दिवे लावण्यासाठी एवढा उशीर का बरं याचे स्पष्टीकरण विचारण्यासाठी आम आदी पार्टी भद्रावती कार्यकारिणी सोनाल पाटील आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष भद्रावती यांच्या नेतृत्वामध्ये शहर अध्यक्ष सुरजभाऊ शहा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विविध पदाधिकाऱ्यांचे. उपस्थितीमध्ये नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी मॅडम यांच्याकडे निवेदन देण्यात आले . मुख्याधिकारी मॅडम यांच्यातर्फे सांगण्यात आले की “केंद्र सरकार तर्फे इ. इ. एस. एल कंपनीकडे पथदिवे लावण्याचे टेंडर दिलेले आहे. त्यामुळे पथदिवे वाटपाचे नगर परिषद कडे असे कोणतेही अधिकार उरलेले नाही. त्यामुळे यामध्ये आम्ही कोणतेही हस्तक्षेप करू शकत नाही. इ. इ. एस. एल कंपनी पथदिव्यांचा साठा नगरपरिषद ला सक्षमपणे पुरवू शकत नसेल तर एलईडी पथदिवे नगरपरिषद ने ही इ इएस एल कंपनीकडून घेणे रद्द करावे. असे आम आदी पार्टी भद्रावती तर्फे नगर परिषद सुचित करण्यात आले. या आधी मात्र असे कोणतेही निर्णय केंद्र सरकार मार्फत नगरपालिकांवर लादण्यात येत नव्हते मग एलईडी. पथदिव्यांचा टेंडर इ इ एस एल कंपनीला का बरं देण्यात आला ही विचारणा पण करण्यात आली. जर ही जनतेची समस्या शासन किंवा प्रशासनाने लवकरात लवकर न सोडवल्यास आम आदमी पार्टी भद्रावती येथील जनतेला “पथदिव्यांनी विना खंबे” “इ इ एस एल हटाओ भद्रावती येथील जनतेला सहभागी करून या विषयांना घेऊन आंदोलन करेल. असे जाहीर आव्हान सोनाल पाटील तालुकाध्यक्ष भद्रावती यांनी माननीय मुख्याधिकारी मॅडम नगर परिषद यांना केले. यावेळी निवेदन देताना आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष सोनाल पाटील, तालुका कोषाध्यक्ष राजकुमार चट्टे, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक ,शहर संघटन मंत्री अनिल कुमार राम, सहसचिव सचिन पाटील, शहर सदस्य बालू भाऊ बांदुरकर, मंगेश भाऊ खंडाळे तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
====================
*”हँलो चांदा न्यूज “, करिता जिल्हा प्रतिनिधी, राजूरा गढ़ चांदूर तालुका प्रतिनिधींची नियुक्ती करणे आहे. इच्छुक प्रतिनिधीने संपर्क साधावा.*
========================
संपादक :- शशी ठक्कर 9881277793