=≠=====================
चंद्रपूर:-
चंद्रपूर शहरातील नवीन अवैध बांधकाम विरोधात मा. पालकमंत्री, मा. जिल्हाधिकारी व मा. पोलिस अधिक्षक यांना मानवाधिकार संघटनेने निवेदन दिले गावपेठ समाधीपूरा येथे गफुर वल्द शेख उर्फ मामु व मोहम्मद कांचवाला यांनीअवैध बांधकाम केले. त्यानुसार महानगर पालिकाने गफ्फुर शेख यांच्यावर फौजदारी गुन्हा 188 दाखल केलेला आहे. व मोहम्मद कांचवाला यांनी केलेले अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश दिलेले आहे. या संदर्भात मानवाधिकार संशोधन संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सिद्धार्थ साखरे, जिल्हा अध्यक्ष योगेश सदालावार, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, जिल्हा सहसचिव अनिता, तालुका अध्यक्ष रशीद खान यांनी अवैध बांधकामास आळा घालण्यास मा. जिल्हाधिकारी, मा. पोलिस अधिक्षक यांचेशी चर्चा करून निवेदन दिलेले आहे. परंतु महानगरपालीकेची हे अवैध बांधकाम तोडण्यास असमर्थता दिसुन येत आहे.
महानगरपालिकेने आदेश काढल्यावर सुध्दा आजपर्यंत हे अवैध बांधकाम तोडण्यास का आले नाही ? यावर परिसरातील जनतेला महानगरपालिकेच्या भुमिकेवर संशय होत आहे. चंद्रपूर महानगरणालिकेला गफ्फुर शेख उर्फ मामु व मोहम्मद कांचवाला हे दोघे चालवित आहे कि महानगरपालिका प्रशासन, जिल्हाधिकारी प्रशासन, पोलिस प्रशासन, महाराष्ट्र शासन सक्षम नसल्याचे दिसुन येत आहे. एक कारवाई करण्यास 1 वर्ष लागुन सुध्दा कारवाई पुर्ण होत नाही असे निदर्शनास येत आहे. जर प्रशासन एखादया संस्थेच्या अवैध बांधकामाच्या तक्रारीवर कारवाई करू शकत नाही ? तर इतर लोकांच्या काही समस्या असल्यास त्याचे निवारण कसे लावतील.
येणाऱ्या काळात जर हे अवैध बांधकाम न तोडल्यास मानवाधिकार संशोधन असोसिएशन तर्फे चंद्रपूर महानगरपालिका विरूध्द तीव्र आंदोलन करन्याचेआवाहन केले आहे.
======================